मलकापूरच्या आ. च. विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी कापीलमध्ये दिला स्वच्छतेचा संदेश
कराड | श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या आ.च.विद्यालय, मलकापूर येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती निमित्त मलकापूर जिमखाना असोसिएशनच्या सहकार्याने मलकापूर परिसरात तसेच घुुमुटमळा, इतिहासकालीन घुमुट परिसरात कापील ग्रामपंचायतीच्या सहकार्याने एक तास स्वच्छतेसाठी उपक्रमांतर्गत परिसर स्वच्छता करून जयंती साजरी करण्यात आली. गांधीजींचे स्वच्छतेचे तसेच श्रमसंस्काराचे मूल्य विद्यार्थ्यांमध्ये रूजवण्यात आले.
संस्थेचे प्रतिनिधी वसंतराव चव्हाण यांच्या शुभहस्ते व कापील ग्रामपंचायत सदस्य यांच्या उपस्थितीत महात्मा गांधीजी व लाल बहादुर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर परिसराची स्वच्छता विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी केली. यावेळी विद्यार्थ्यांनी स्वच्छतेबाबतच्या घोषणा देत, स्वच्छतेचे महत्व सांगत, स्वच्छता मोहीमेत सक्रीय सहभाग घेऊन ऐतिहासिक ठिकाण घुमटाची, मलकापूर परिसराची स्वच्छता केली. स्वच्छतेत सहभागी असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मलकापूर जिमखाना असोसिएशन यांचे वतीने तसेच कपिल ग्रामपंचायतीच्यावतीने खाऊ वाटप करण्यात आले.
यावेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. अरुणा कुंभार, उपमुख्याध्यापक ए. बी. थोरात, पर्यवेक्षक बी. जी.बु रुंगले सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, मलकापूर जिमखाना असोसिएशनचे पदाधिकारी, परिसरातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी. व्ही. कवळे यांनी तर आभार शरद तांबवेकर यांनी मानले. सदर उपक्रमाच्या यशस्वितेसाठी डी. व्ही. कवळे, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.