आ. बाळासाहेब पाटील यांच्या न्यायालयीन लढ्याला यश : कराड उत्तरमधील 62 कोटींच्या विकास कामांवरील स्थगिती उठवली
मसूर प्रतिनिधी | गजानन गिरी
कराड-उत्तर विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडी शासनाच्या माध्यमातून आमदार बाळासाहेब पाटील यांनी सुमारे 79 कोटी रूपयांच्या विविध विभागाकडील कामांना मंजूरी मिळवली होती. त्यास शिंदे-फडणवीस सरकारने दि.18/07/2022 व 21/07/2022 च्या शासन आदेशाने स्थगीती दिली होती. त्याविरूध्द आमदार बाळासाहेब पाटील यांनी मा. उच्च न्यायालयामध्ये रिटपिटीशन याचिका दाखल केलेल्या होत्या. त्याचा निकाल आमदार बाळासाहेब पाटील यांच्या बाजूने लागला होता व मा. उच्च न्यायालयाने सरकारला या कामांवरील स्थगीती उठवणेबाबत आदेश दिलेला होता. त्यामधून शासनाने केवळ 17 कोटींच्या कामांची स्थगीती उठवलेली होती. उर्वरीत 62 कोटींच्या कामांवरील स्थगीती कायम होती. त्याविरूध्दही आमदार बाळासाहेब पाटील यांनी न्यायालयात अवमान याचिका दाखल केली होती. मा.उच्च न्यायालयाने सुमारे 83 याचिका निकाली काढल्या व निकाल याचिकाकर्त्यांच्या बाजूने लागला, त्यानंतर शासनाने दि. 29/09/2023 रोजी एक स्वतंत्र आदेश मुख्य सचिव महाराष्ट्र शासन यांचेवतीने काढलेला असून त्यामध्ये दि.18/07/2022 व 21/07/2022 या रोजीचे स्थगीती आदेश सरसकट उठविण्यात आल्याचे नमुद केलेले आहे. त्यामुळे आमदार बाळासाहेब पाटील यांनी मंजूर करून आणलेल्या सुमारे 62 कोटींच्या कामांची निविदा प्रक्रिया लवकरच सुरू होईल व सदरची कामे प्रत्यक्षात सुरू होणार असल्याची माहिती कार्यालयाकडून सांगण्यात आली.
सदरची कामे पुढीलप्रमाणे ः- अर्थसंकल्प योजनेअंतर्गत रा.मा.140 ते ब्रम्हपूरी-अंगापूर-निगडी-कामेरी-फत्यापूर-देशमुखनगर- जावळवाडी फाटा-वेणेगांव-कोपर्डे-तुकाईवाडी-कालगांव रस्ता प्रजिमा.110 कि.मी.23/900 ते 24/250 व कि.मी.25/400 ते 25/650 ची सुधारणा (चढ सुधारणा) करणे ता.जि.सातारा रक्कम रूपये 95 लक्ष, रा.मा.140 ते तासगांव-अंगापूर-वर्णे-अपशिंगे-तासगांव रस्ता प्रजिमा.37 कि.मी.19/500 ते 24/500 (भाग-नागठाणे-गणेशखिंड-सासपडे) ची सुधारणा करणे ता.जि.सातारा. रक्कम रूपये 380 लक्ष, खंडाळा-कोरेगांव-रहिमतपूर-कराड-सांगली रस्ता रा.मा.142 वरील कि.मी. 65/500 मधील रहिमतपूर चौकाची सुधारणा करणे ता.कोरेगांव. रक्कम रूपये 500 लक्ष, सासपडे-निसराळे-तारगांव-वाठार-आर्वी-नागझरी रस्ता प्रजिमा.35 कि.मी. 19/100 ते 22/00 (भाग-मोहितेवाडी ते वाठार) ची रूंदीकरणासह सुधारणा करणेे ता.कोरेगांव. रक्कम रूपये 237 लक्ष, राष्ट्रीय महामार्ग 548 सी ते खिरखिंड-एकंबे-कण्हेरखेड-अपशिंगे-साप-पिंपरी -वाठार किरोली रस्ता प्रजिमा.33 अ कि.मी.4/00 ते 6/00 (भाग-शेल्टी ते एकंबे) ची सुधारणा करणे ता.कोरेगांव. रक्कम रूपये 190 लक्ष, राष्ट्रीय महामार्ग 548 सी ते खिरखिंड-एकंबे-कण्हेरखेड-अपशिंगे-साप-पिंपरी -वाठार किरोली रस्ता प्रजिमा.33 अ कि.मी.9/500 ते 12/00 (भाग-एकंबे ते अपशिंगे) ची सुधारणा करणे ता.कोरेगांव. रक्कम रूपये 332 लक्ष, राष्ट्रीय महामार्ग 548 सी ते खिरखिंड-एकंबे-कण्हेरखेड-अपशिंगे-साप-पिंपरी -वाठार किरोली रस्ता प्रजिमा.33 अ कि.मी.18/00 ते 20/00 (भाग-साप ते पिंपरी) ची सुधारणा करणे ता.कोरेगांव. रक्कम रूपये 190 लक्ष, राष्ट्रीय महामार्ग 548 सी ते खिरखिंड-एकंबे-कण्हेरखेड-अपशिंगे-साप-पिंपरी -वाठार किरोली रस्ता प्रजिमा.33 अ कि.मी.22/50 ते 24/100, 25/900 ते 26/500 (भाग-पिंपरी ते वाठार) ची सुधारणा करणे ता.कोरेगांव. रक्कम रूपये 95 लक्ष, रा.मा.60 ते बनपूरी-अंबवडे-होळीचागांव-शेनवडी-चोराडे ते रा.मा.143 रस्ता प्रजिमा.96 कि.मी.11/800 ते 15/200 (भाग-पुनवडी ते चोराडे) रस्त्याची सुधारणा करणे ता.खटाव. रक्कम रूपये 137 लक्ष, रा.मा.143 ते पारगांव-पुसेसावळी येथून औध ते रा.मा.147 रस्ता प्रजिमा. 117 कि.मी.1/400 ते 3/500 (भाग-पारगांव ते पुसेसावळी) रस्त्याची सुधारणा करणे ता.खटाव. रक्कम रूपये 118 लक्ष, रा.मा.143 शामगांव खिंड-पारगांव-गोरेगांव-पुसेसावळी-वंजारवाडी-गणेशवाडी-औंध ते रा.मा.143 रस्ता प्रजिमा. 118 कि.मी.9/500 ते 12/000 (भाग-कळंबी फाटा ते गणेशवाडी) रस्त्याची सुधारणा करणे ता.खटाव. रक्कम रूपये 237.50 लक्ष, रा.मा.143 शामगांव खिंड-पारगांव-गोरेगांव-पुसेसावळी-वंजारवाडी-गणेशवाडी-औंध ते रा.मा.143 रस्ता प्रजिमा. 118 कि.मी.12/000 ते 14/700 (भाग-गणेशवाडी ते औंध) रस्त्याची सुधारणा करणे ता.खटाव. रक्कम रूपये 137.50 लक्ष, जलसंधारण महामंडळाकडील मोठे व लहाण सिंचन बंधारे योजनेतून 0 ते 100 हेयटर सिंचन क्षमतेचे बंधारे बांधणे करीता – निसराळे ता.सातारा येथे खोलवडी ओढा येथे बंधारा बांधणे, रक्कम रूपये 40.25 लक्ष, निसराळे ता.सातारा येथे ओलखडी ओढा येथे बंधारा बांधणे, रक्कम रूपये 48.74 लक्ष, खोजेवाडी क्र.1 ता.सातारा येथे बंधारा बांधणे, रक्कम रूपये 71.91 लक्ष, खोजेवाडी क्र.2 ता.सातारा येथे बंधारा बांधणे, रक्कम रूपये 74.44 लक्ष, 0 ते 250 हेयटर सिंचन क्षमतेचे बंधारे- शामगांव ता.कराड येथे बंधारा बांधणे, रक्कम रूपये 544.09 लक्ष, सदाशिवगड (राजमाची) ता.कराड येथे बंधारा बांधणे, रक्कम रूपये 362.99 लक्ष, किवळ ता.कराड निगडी खिंड येथे बंधारा बांधणे, रक्कम रूपये 896.84 लक्ष, जायगांव ता.कोरेगांव येथे बंधारा बांधणे, रक्कम रूपये 363.26 लक्ष, नलवडेवाडी ता.कोरेगांव येथे बंधारा बांधणे, रक्कम रूपये 501.31 लक्ष,
अल्पसंख्यांक बहुल विकास योजनेतून मसूर ता.कराड येथे कब्रस्तान संरक्षण भिंत व शेड बांधणे, रक्कम रूपये 12.00 लक्ष, काशीळ ता.सातारा येथे कब्रस्तान संरक्षण भिंत व शेड बांधणे, रक्कम रूपये 12.00 लक्ष, पुसेसावळी ता.खटाव येथे कब्रस्तान संरक्षण भिंत व शेड बांधण, रक्कम रूपये 12.00 लक्ष, पाल ता.कराड येथे कब्रस्तान संरक्षण भिंत व शेड बांधणे, रक्कम रूपये 12.00 लक्ष, तारगांव ता.कोरेगांव येथे कब्रस्तान संरक्षण भिंत व शेड बांधणे, रक्कम रूपये 12.00 लक्ष, मुसांडवाडी ता.खटाव येथे कब्रस्तान संरक्षण भिंत व शेड बांधणे, रक्कम रूपये 12.00 लक्ष, वहागांव ता.कराड येथील राष्ट्रीय महामार्ग ते मुस्लिम समाज दफनभूमीकडे जाणारा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे, रक्कम रूपये 12.00 लक्ष, कराड तालुययातील मौजे कोपर्डे ह, उंब्रज, तळबीड, किवळ, खोडशी या गावांमध्ये अल्पसंख्यांक वस्तीमध्ये विविध विकास कामे करणे प्रत्येकी 10 लाख प्रमाणे रक्कम रूपये 50 लक्ष, नगरविकास विभाग अंतर्गत विशेष रस्ता अनुदान व वैशिष्टपूर्ण योजनेतून कराड नगर परिषद हद्दीतील पेठ सोमवार सि.स.नं.70 मंजूर शहर विकास योजनेमधील सार्वजनिक व निम सार्वजनिक वापरा करिता दर्शविलेल्या 250 चौ.मी. जागेत अभ्यासिका पार्किंग सहित बांधणे, रक्कम रूपये 20 लक्ष, कराड वाखाण भाग रुक्मिणी गार्डन भाग-1 च्या पटेल यांच्या ओपन स्पेस मध्ये ओपन जीम व गार्डन विकसित करणे, रक्कम रूपये 16.20 लक्ष, रुक्मिणीगार्डन येथील श्री.पोलदार घर ते सराटे घर, श्री.निलेश सुर्यवंशी यांचे घर ते औधे यांचे घर, रुक्मिणीपार्क येथील श्री.उदय यांदे घर ते कङ्खी घर, अशोक विहार येथील श्री.बेलवणकर ते साळुंखे घर, श्री.बादल घर ते साळुंखे घर व रूयमीणीनगर येथील श्री.लाड घर रस्ता काँक्रीटीकरण करणे, रक्कम रूपये 13.80 लक्ष, पेठ शनिवार मार्केट यार्ड येथील लक्ष्मी नारायण चौक ते पूर्वेस राजू शिंदे यांचे ऑफिस पर्यंत आर.सी.सी. गटर्स करणे, रक्कम रूपये 10.00 लक्ष, पेठ शनिवार मार्केट यार्ड येथील लक्ष्मी नारायण चौक ते रघुनाथ कदम काका बंगल्या पर्यंत आर.सी.सी. गटर्स करणे, रक्कम रूपये 10.00 लक्ष, कराड वाढीव भाग वाखाण रोड केशर संकुल ते दक्षिणेस श्री.कलबुर्गी यांचे घरापर्यंतचा रस्ता डांबरीकरण करणे व कराड नगर परिषद हद्दीतील भागामधील वाखाण रस्त्यावरील श्री.शहा यांची इमारत ते दक्षिणेस श्री.आरब यांचे बंगल्यापर्यंतच्या रस्त्यावरील पावसाच्या पाण्याचा निचरा करणेसाठी बंदिस्त आर.सी.सी. गटर्स लाईन करण, रक्कम रूपये 15.00 लक्ष, कराड येथील कृष्णा पूल परिसर सुशोभिकरण करणे व वॉकींग ट्रॅक तयार करणे ता.कराड, रक्कम रूपये 70 लक्ष, कराड शहरातील वाखाण परिसरातील संत सखुनगर मधील ओपन स्पेस प्लॉट नंबर 10 सर्व्हे नं.71/2अ, 71/2 ब याठिकाणी बगीचा विकसित करणे ता.कराड, रक्कम रूपये 20 लक्ष, कराड नगरपरिषद हद्दीमधील पेठ शनिवार डॉ.सतिश शिंदे हॉस्पीटल ते संगम हॉटेल कंपाऊंड पर्यंत रस्ता काँक्रीटीकरण करणे ता.कराड, रक्कम रूपये 30 लक्ष, कराड नगरपरिषद हद्दीमधील पेठ शनिवार मार्केट यार्ड गेट नं.5 ते गेट नं.1 पर्यंत रस्त्यावर पूर्व बाजूस आर.सी.सी. गटर करणे ता.कराड, रक्कम रूपये 60 लक्ष आदी कामांचा समावेश असून सदर कामांची निविदा प्रक्रिया लवकरच सुरू होवून, कामे मार्गी लागणार असल्याचे आमदार बाळासाहेब पाटील यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.