नऊ मंत्र्यांच्या शपथविधीनंतर पुन्हा राष्ट्रवादीत धमाका होणार : शंभूराज देसाई

सातारा प्रतिनिधी | वैभव बोडके
पित्र पक्ष संपला असून आता मंत्रिमंडळ विस्ताराची अडचण राहिली नसल्याने लवकरच निर्णय होईल. शरद पवार गटातील राष्ट्रवादातील बड्या नेत्यांच्या चर्चा आमच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सोबत सुरू आहेत, त्यामुळेच मंत्रिमंडळ विस्ताराला वेळ लागत आहे. राष्ट्रवादीच्या 9 मंत्र्यांनी शपथ घेतली आता तसचं काहीतरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा गाैप्यस्फोट उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी केला आहे.
सातारा येथे माध्यमांशी मंत्री श्री. देसाई बोलत होते. मंत्रिमंडळ विस्ताराला वेळ लागत असल्याच्या चर्चावर तसेच राष्ट्रवादीतून काहीजण युती सरकारमध्ये सामील होण्याबाबत मंत्री श्री. देसाई यांनी भूमिका मांडली. सध्या सुरू असलेल्या चर्चामुळे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचा कोण मोठा नेता शिंदे- फडणवीस सरकार सोबत जाणार हे पाहावं लागणार आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सरकार सोबत जातील अशी चर्चा दबक्या आवाजात सुरु आहे. त्यामुळे नक्की दसऱ्यात कि दिवाळीत धमाका होणार की नुसताच धूर निघणार?
मंत्री शंभूराज देसाई म्हणाले, राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातील अनेक नेत्यांच्या सरकार सोबत येण्यात चर्चा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित दादा यांच्या सोबत होत आहे. यामुळेच कदाचित मंत्रीमंडळ विस्ताराला विलंब लागत आहे. लवकरच तो विस्तार होईल, असं सांगुन दसरा आपण उत्साहात साजरा करत असतो. तर दिवाळीत मोठा धमाका होईल.



