Satara News : खोजेवाडीत शेतात आल्याचे पिकातील 27 लाखाचा गांजा जप्त

सातारा प्रतिनिधी | वैभव बोडके
शेतात आल्याचे पिकात गांज्याच्या झाडांची लागवड करणाऱ्या एकास पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्या शेतातून 27 लाख 34 हजार 500 रूपयांची गांजाची झाडे जप्त केली आहेत. यामध्ये 109.380 किलोग्रॅम गांजा जप्त केला असल्याची माहिती सातारा गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिली आहे.
पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना खोजेवाडी गावातील लहु कुंडलिक घोरपडे यांच्या मानकर शिवार नावाचे शिवारातील आले पिकाची लागवड करण्यात आली असून त्यामध्ये गांजाची लागवड करुन विक्री करणेसाठी तो जोपासत असल्याची माहिती मिळाली. पोलिस पथकाने खोजेवाडी येथे पिकाचे शेतात जावुन पाहणी केली असता शेतामध्ये गांजाची झाडांची लागवड केल्याचे आढळुन आले. याठिकाणी 18 गांजाची झाडे पथकाने ताब्यात घेवुन त्याचे वजन केले असता त्याचे वजन 109.380 किलोग्रॅम इतके आहे. जप्त करण्यात आलेल्या गांजाच्या झाडांची किंमत 27 लाख 34 हजार 500 रुपये असून शेतकऱ्यावर गुन्हा नोंद केला आहे.
पोलीस अधीक्षक समीर शेख व अपर पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सहा. पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, रविंद्र भोरे, पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील, विश्वास शिंगाडे, अमित पाटील पोलीस अंमलदार अतिश घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, लक्ष्मण जगधने, शिवाजी गुरव, हसन तडवी, शिवाजी भिसे, राजु कांबळे, गणेश कापरे, अमित माने, ओंमकार यादव, धिरज महाडीक, प्रविण पवार, वैभव सावंत, संकेत निकम, संभाजी साळुंखे व फॉरेन्सीक विभागाचे अंमलदार यांनी सदरची कारवाई केली.



