कराड | विशाल वामनराव पाटील
राष्ट्रवादी कुणाची शरद पवार की अजित पवार हे मी 10 मिनिटात सांगतिले असते, परंतु मी पंतप्रधान नाही, माझे 40 खासदार असतील. तेव्हा मी पंतप्रधान असेन तेव्हा लगेच या प्रश्नाचे उत्तर दिल असते. सत्ता तो पारधी असतो, पंतप्रधानच सर्व फायनल करणार आहेत. परंतु, लोक हुशार झाले आहेत, पक्षाचा संस्थापक कोण आहे आणि कोण फूटुन गेलं आहे. मुख्यमंत्री हे आहेत आणि कोण माईक बाजूला ओढुन घेतला जातोय, हे सामान्य लोकांनाही कळतं. महाराष्ट्रातील जनता हुशार आहे. कष्ट करणारा माणूस बाप तो बापच असतो. परंतु, मी टीकाटीप्पणी करत नाही कारण अजित पवार मित्र आहेत. पवार साहेब मार्गदर्शक आहेत, जेव्हा माझा जन्म नव्हता तेव्हा ते गृहमंत्री होते, असे रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी म्हटले आहे.
आज राष्ट्रवादी पक्ष कुणाचा सुनावणी सुरू असून याबाबत तुम्हाला काय वाटते, त्यावर महादेव जानकर माध्यमांशी बोलत होते. कराड येथे बळीराजा शेतकरी संघटना आणि रासप यांच्या माध्यमातून ऊसाला दर 5 रूपये मिळावा याकरिता कराड ते पाटण अशी ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली. यावेळी ते विविध विषयांवर माध्यमांशी बोलत होते. भाजपमधून महादेव जानकर बाहेर पडणार का यावर ते म्हणाले, आज 4 राज्यात माझ्या पक्षाला मान्यता आहे. भाजपाला गरज वाटत असेल तर आम्हांला ठेवलं. अन्यथा आमचा आमचा मार्ग मोकळा आहे. मलाच माझी सत्ता आणायची आहे. उद्या कुणाशीही आमची युती होईल. भाजपला आमची गरज नसले तर आम्ही काय मागे लागलो आहे का.
आम्हाला सत्ता द्या, 10 मिनिटात आरक्षणाचा प्रश्न मिटवू : महादेव जानकर
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळाले पाहिजे. संसदेत ओबीसी आरक्षणाचा कोटा वाढवला पाहिजे. 2009 साली मी पहिल्यांदा मराठा समाज हा ओबीसी आरक्षणा हक्कदार असल्याबाबत पुस्तक लिहले आहे. तामिळनाडूत 63 टक्के आरक्षण आहे, मग महाराष्ट्रात असे का होत नाही ? असा प्रश्न उपस्थित जनतेने हुशार झाले पाहिजे. आरक्षणाचा प्रश्न हा मी आमदार म्हणून अथवा राज्य शासनाच्या हातात नाही. तो दिल्लीच्या हातात आहे. मला खासदार करून पाठवा. दिल्लीत रासपचे सरकार आणा, पंजाबराव पाटील यांना कराडात रासपचे खासदार करा. मी तुमचा आरक्षणाचा प्रश्न दहा मिनिटात सोडवून टाकतो. आमच्या हातात सत्ता द्या. आमच्याजवळ आज सत्ता आहे का? आम्ही बाहेर आहोत. धनगर समाजाला सुद्धा न्याय मिळाला पाहिजे. देशात छत्रपती शाहू महाराज यांनी प्रथम आरक्षण सुरू केले. आज त्यांच्याच समाजाला 70 वर्षाने आरक्षण मागावे लागत असल्याची सांगत हे अपयश कोणाचे असा प्रश्नही माजी मंत्री महादेव जानकर यांनी उपस्थित केला आहे.