कालेच्या डाॅ. संग्राम माळी यांना युरोपीय युनिवर्सिटीची डाॅक्टरेट पदवी

कराड | काले येथील डॉ. संग्राम माळी यांना बॅंकाक थायलंड येथील युरोपीय इंटरनॅशनल युनिवर्सिटीकडून वर्ड पिस ब्रँड अॅम्बेसिडर निवड आणि डाॅक्टरेट पदवीने सन्मानित करण्यात येणार आहे. यावेळी बाॅलिवूड किंग शाहरूख खान यांनाही सन्मानित करण्यात येणार आहे. डाॅ. संग्राम माळी यांनी केलेल्या अध्यात्मिक क्षेत्रातील कार्याची दखल घेवून त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. दि. 3 डिसेंबर रोजी थायलंड येथे डाॅ. माळी यांना सन्मानित केले जाणार आहे.
डाॅ. माळी हे गेले 23-24 वर्षे पुणे स्थायिक असून त्यांचे अध्यात्मिक क्षेत्रात भरीव कार्य आहे. त्यासोबत दलाई लामा फाऊंडेशन सदस्य, बराक अोबामा फाऊंडेशन सदस्य, पिलाई युनिर्वसिटीचे संचालक, पाणी फाऊंडेशनचे संचालक यासह विविध क्षेत्रात त्याचे काम आहे. काले येथील महात्मा गांधी विद्यालयाचे ते विद्यार्थी असून त्यांचे पुढील शिक्षण पुणे येथे झाले.
कराड तालुक्यातील ग्रामीण भागातील काले येथील डाॅ. संग्राम माळी यांच्या अध्यात्मिक, क्रिडा, शैक्षणिक, राजकारण कार्याची दखल घेवून प्रथमच भारत देशात डाॅक्टरेट पदवी मिळत आहे. त्याच्या या सन्मानबद्दल काले येथील माळी समाज, पोलिस पाटील संघटना तसेच मित्र परिवाराकडून त्याचे अभिनंदन करण्यात येत आहे.