टेंभूत कृषीकन्यांकडून स्वच्छता अभियान
कराड | टेंभू (ता. कराड) येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न जयवंतराव भोसले कृष्णा कृषी महाविद्यालय रेठरे बुद्रुक व कै. गोपाळ गणेश आगरकर हायस्कूल, जिल्हा परिषद शाळा व ग्रामपंचायत टेंभू यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी सरपंच रूपाली भोईटे, उपसरपंच शिवाजी साळुंखे, ग्रामपंचायत सदस्य अधिकराव पाटील, अनिकेत नलवडे, वंदना पाटील, रेखा भंडारे, संगिता शिंदे, सुशिला माने, जोतिराम कदम, अविनाश सावंत, शिंदे सर, विनोद भंडारे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी शुद्ध पिण्याचे पाणी, घराची स्वच्छता, परिसर स्वच्छता, सांडपाण्याचे नियोजन आणि घनकचऱ्याचे व्यवस्थापन याविषयी कृषीकन्यानी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. यावेळी गावातील ठिकठिकाणी कृषीकन्यांनी स्वच्छता मोहिम राबवत परिसर स्वच्छ केला.
यावेळी कृषीकन्या शुभांगी सानप, यास्मीन मुलाणी, नम्रता पिचड, वृषाली रूपनवर, स्नेहल थोरात, लिशा वसावे यांनी हे अभियान प्राचार्य डॉ. अशोक फरांदे, प्राध्यापक दिपक भिलवडे, प्राध्यापक अमोल अडके, प्राध्यापक प्रविण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थांच्या मदतीने राबविण्यात आले.