(Video) दोन राजेंच्या भेटीत उदयनराजेंना लागला ‘ठसका’
वैभव बोडके | सातारा प्रतिनिधी
सातारा जिल्ह्यातील छ. उदयनराजे भोसले आणि फलटणचे रामराजे नाईक- निंबाळकर यांच्यातील राजकीय वाद राज्याने पाहिला आहे. लोणंदमधील कंपनीच्या वादानंतर मात्र, काल दोन्ही राजे फलटणमध्ये एकत्रित आल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. या भेटीत रामराजे यांनी हसत- हसत उदयनराजेंचे स्वागत केले, परंतु, उदयनराजेंना हसताना चांगलाच ठसका लागला.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातारा जिल्हा दौऱ्यावर होते. सकाळी कराड नंतर फलटण असात दाैऱ्याच्या निमित्ताने खासदार उदयनराजे भोसले जाहीर सभेला उपस्थित राहिले होते. कार्यक्रमानंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) नेते व माजी सभापती रामराजे नाईक- निंबाळकर यांची त्यांच्या लक्ष्मीविलास पॅलेस या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.
माजी सभापती रामराजे यांच्या निवासस्थानी अर्धा तास कमरा बंद चर्चा झाली. या चर्चेचा तपशील समजू शकला नसला. तरी स्वागतावेळी रामराजे म्हणाले, ‘उदयन महाराज चिडलेले असतात, त्यावेळी मला काहीही वाटत नाही. पण, महाराज गालातल्या गालात हसले की, माझ्या पोटात गोळा येतो.’, असं मिश्किल टोला लगावला. स्वागतावेळी छ. उदयनराजे भोसले यांना हसू आवरता येत नसल्याचा पहायला मिळाले, हसता- हसता त्यांना चांगलाच ठसकाही लागला.