ताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराजकियराज्यलोकसभा 2024सातारा

आ. शशिकांत शिंदेची गुगली : राजकीय उलथापलाथ होणार अन् शरद पवार विकेट घेणार

सातारा प्रतिनिधी | वैभव बोडके
आ. शशिकांत शिंदे यांनी क्रिकेटचा संदर्भ देत अजून बरीच राजकीय उलथापलथ होणार असल्याचे सांगितले. ते म्हणाले, या देशात आयपीएल आणी 20- 20 मॅच कोणी आणली खा. शरद पवार यांनी आणली. त्यामुळे पवार साहेब आयपीएलचे जनक आहे, तेव्हा कोणता खेळाडू ठेवायचा, कोणाची विकेट घ्यायची आणि कोणता संघ खेळणार हे खा. शरद पवारच ठरवतात. तेव्हा अजून बऱ्याच उलथापालथी होणार असल्याची राजकीय गुगली आ. शिंदे टाकली.

दिवंगत बाळासाहेब ठाकरेंनी धाडस दाखवले
कारसेवक असल्याचे पुरावे फडणवीस यांना द्यावे लागतात, हेच दुर्दैवी आहे. बाबरी मशीद पाडली, त्यावेळी कोणी जबाबदारी घेत नव्हते. परंतु, दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी धाडस दाखवले. शिवसेनेने घटनेची जबाबदारी घेतल्याचे व त्या शिवसैनिकांचा अभिमान असल्याचे जाहीर केले. त्यावेळी कोणी धाडस करत नव्हते. आज मात्र सर्वजण याचे श्रेय घेत आहेत आहेत.

पंतप्रधानाची हीच का लोकप्रियता
मराठा आरक्षणाबाबत ज्या नेत्यांची भुमिका स्पष्ट आहे, त्यांच्याबाबत गावबंदीचा निर्णय घेताना विचार करावा. अन्यथा सरसकट सर्वच नेत्यांबाबत चुकीचा संदेश जाईल. सरकारने समाजात तेढ वाढू नये, यासाठी प्रयत्न करावे आणि आरक्षणाचा प्रश्न किती दिवसांत मार्गी लावणार हे स्पष्ट करावे. मुंबईला आंदोलनकर्ते आले तर मुंबई आणि पर्यायाने देश ठप्प होईल. देशाची निवडणूक लोकांनी हातात घेतली तर इतिहास घडेल. अन्यथा पुढील निवडणुक होईल हेही सांगता येणार नाही. भाजपाने इतर पक्षातील मातब्बर नेते घेतले तरीही ईडीच्या धाडी विरोधकांच्या घरी पडत आहेत. दोन दिवसात पाच ठिकाणी ईडीच्या धाडी पडल्या आहेत. पंतप्रधानाची हीच का लोकप्रियता असा सवाल आ. शिंदे यांनी केला.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker