मुख्यमंत्र्यांचे स्टेरिंग नातवाच्या हातात, नातवाला शेतातील स्ट्रॉबेरी भरवली…

सातारा प्रतिनिधी | वैभव बोडके
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या सुट्टीवर साताऱ्यातील दरे गावी आले आहेत. दरम्यान, आज सकाळच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या नातवाला घेऊन शेतात गेले. त्यावेळी जात असताना गाडीचे स्टेअरिंग आपल्याला त्याच्या हातात दिले. तसेच शेतात गेल्यानंतर आपल्या हाताने नातू रुद्राक्षला स्ट्रॉबेरी भरवली.
थंड हवेचं ठिकाणं असलेला महाबळेश्वर तालुका स्ट्राॅबेरीसाठी प्रसिध्द आहे. राज्यासह परराज्यातून स्ट्राॅबेरीची चव चाखण्यासाठी पर्यटक येत असतात. पर्यटनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरे गावासह महाबळेश्वर, पाचगणी, तापोळा, बामणोली परिसरात स्ट्राॅबरेची शेती मोठ्या प्रमाणावर आहे. मुख्यमंत्री आपल्या कुटुंबासह नातवाला घेवून मूळ दरे गावी आले आहेत.
जरांगे- पाटील मुंबईला अन् मुख्यमंत्री गावाला
मनोज जरांगे- पाटील मुंबईला निघालेले असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या गावी कुटुंबासह गेल्याने त्याच्यावर टीका होवू लागली आहे. गेल्या दोन दिवसापासून दरे गावी आहेत. आज सकाळी मुख्यमंत्री आपल्या नातवासोबत स्ट्राॅबेरी चारतानाचा व्हिडिअो आणि फोटो व्हायरल होताच. त्याच्यावर टीका होवू लागली आहे.