कराड तालुक्यातील 3 गावातून चोरीला गेलेल्या दुचाकी सापडल्या
कराड – कराड तालुक्यातील तांबवे, मलकापूर आणि कोळे येथून दुचाकी चोरून नेणाऱ्या तीन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून दुचाकी मिळविण्यात यश मिळाले आहे. तांबवे (ता. कराड) येथुन रहाते घरासमोरुन अंगणातुन प्लेझर मोटारसायकल (क्रमांक- MH- 50- T- 9868) ही मोटर सायकल चोरल्याची फिर्याद प्रकाश पंढरीनाथ सुतार (रा. तांबवे, ता. कराड) यांनी कराड तालुका पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती. या तक्रारीवरून गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीसांनी चोरीचा छडा लावला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, प्रकाश सुतार यांच्या फिर्यादीवरून अमंलदार नितीन येळवे, सज्जन जगताप, सचिन निकम, उत्तम कोळी, प्रफुल्ल गाडे, सहा.पो.उपनिरीक्षक प्रदीप कांबळे यांना मिळाले बातमीनुसार विंग (ता. कराड) येथे सापळा लावला असता. एक प्लेजर मोटारसायकल वरुन 3 विधीसंघर्षग्रस्त बालकांना जात असताना संशयीतरित्या पकडण्यात आले. पोलीस स्टेशन अभिलेखावर खात्री करुन, त्यांना पोलीस स्टेशनला आणुन विश्वासात घेवुन विचारपुस केली असता सदरची प्लेजर मोटारसायकल (क्रमांक- MH- 50- T- 9868) ही तांबवे चोरी केलेचे कबुल केले. तसेच त्यांचेकडून कोळे येथील बैलगाडी शर्यती मधील पार्किंगमधुन चोरी केलेली बजाज प्लॅटीना मोटारसायकल (क्रमांक- MH- 10- AP- 6723) व मलकापुर नगरपालिकाजवळुन चोरी केलेली एच एफ डिलक्स मोटारसायकल (क्रमांक- MH- 50- F- 6650) या मोटारसायकली दि. 23 व 28 रोजी चोरी केल्याचे सांगितले. एकूण 3 मोटारसायकल जप्त करण्यात आल्या आहेत.
वरील कामगिरी पोलीस अधिक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती आचंल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकुर, पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अमंलदार नितीन येळवे, सज्जन जगताप, सचिन निकम, उत्तम कोळी, प्रफुल्ल गाडे, कोळे ओपीचे सहा. पो. उपनिरीक्षक प्रदीप कांबळे यांनी केली असुन पुढील तपास पो. हवा. नितीन येळवे हे करीत आहेत.
तांबवेत एका रात्रीत दुचाकी चोरीचा धुमाकूळ
तांबवे गावात 23 फेब्रुवारीला एका रात्रीत तीन दुचाकी गाड्या चोरीला गेल्या होत्या. या चोरीच्या घटनेमुळे पूर्ण गावात घबराटीचे वातावरण होते. यामध्ये किशोर पाटील यांची दुचाकी चोरून चोरट्यांनी दुसऱ्या गल्लीत नेवून लावली होती तर अन्य एक दुचाकी रघुनाथ मंदिर परिसरातून गावातील पवार गल्लीत लावली होती. मात्र, प्रकाश सुतार यांची दुचाकी चोरून नेली होती. तिचा शोध घेण्यात आला होती मात्र ती आढळून आली नव्हती.