ताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रप्रशासनराजकियराज्यसातारा

शंभूराज देसाईंच्या मतदार संघातील 151 गावातील पाणंद रस्त्यांना निधी : पहा कोण-कोणत्या गावांचा समावेश

पाटण – पाटण विधानसभा मतदार संघातील डोंगरी व दुर्गम भागामधील शेत पाणंद रस्ते अरुंद व दुरुस्त करण्यासाठी मातोश्री ग्रामसमृध्दी योजनेतून तब्बल 297 किलोमीटरचा रस्ता तयार होणार आहेत. उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांचा मतदार संघातील 151 गावांना या योजनेचा लाभ होणार आहे. वर्षोनुवर्ष रखडलेल्या शेतातील पाणंद रस्त्यांचा प्रश्न मार्गी लागणार शासन निर्णय पारित झाल्याची माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे. यामध्ये पाटण, कोयना, ढेबेवाडी, मल्हारपेठ, मोरगिरी, तारळे आणि तांबवे- सुपने भागातील गावच्या पाणंद रस्त्यांचा समावेश करण्यात आला आहे.

पाटण विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांची शेत/पाणंद रस्त्यांअभावी होणारी गैरसोय लक्षात घेऊन राज्य शासनाच्या रोजगार हमी विभागाकडे शेत/पाणंद रस्ते मंजूर होण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. त्यामुळे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून सन 2021-22 व सन 2022-23 या आर्थिक वर्षामध्ये मातोश्री  ग्रामसमृध्दी शेत/पाणंद रस्ते योजनेअंतर्गत आतापर्यंत पाटण विधानसभा मतदारसंघात आतापर्यंत 135 गावांतील 209 कि.मी. लांबीच्या शेत पाणंद रस्त्यांची कामे मंजूर करण्यात आली आहेत. तसेच सन 2023-24 या आर्थिक वर्षाच्या पुरवणी आराखडयांतर्गत पाटण विधानसभा मतदारसंघातील 151 गावांतील तब्बल 297 कि.मी.लांबीच्या शेत/पाणंद रस्त्यांच्या कामांचा समावेश करुन या कामांना मंजूरी देण्यात आली आहे.

मंजूरी देण्यात आलेल्या शेत/पाणंद रस्त्यांच्या कामांची गावे व अंतर अंबवडे शिंदेवाडी 0.800 किमी, आंब्रग  0.800 किमी, आंब्रुळे  1.500 किमी, आडदेव 1.500 किमी, आडूळ 2 किमी, आबईचीवाडी 0.500  किमी, आबदारवाडी 1 किमी, आरेवाडी  0.600 किमी, उमरकांचन 2.300 किमी, ऊरुल 1.300 किमी, कडववाडी 1.500 किमी, करपेवाडी 2 किमी, भोळेवाडी 4 किमी, कवरवाडी 1 किमी, कसणी 3 किमी, काढोली 0.700 किमी, कामरगाव 0.300 किमी, काळगाव 6 किमी, काळोली 1 किमी, किल्ले मोरगिरी 2.300 किमी, कुंभारगाव 4 किमी, कुठरे 2 किमी, केरळ 0.950 किमी, केळेवाडी 3 किमी, केसे 2 किमी, कोकीसरे 1.8 किमी, कोयनानगर 1 किमी, कोरिवळे 1 किमी, कोळेकरवाडी 4 किमी, खळे 2 किमी, खुडुपलेवाडी 1.200 किमी, गमेवाडी ता.कराड 1 किमी, गलमेवाडी 0.200 किमी, गोकूळ 2 किमी, गोठणे 1 किमी, चव्हाणवाडी चाफळ 1.700 किमी, चव्हाणवाडी धामणी 4 किमी, चाफळ 4.500 किमी, चाळकेवाडी 1 किमी, चोपडी 1 किमी, जंगलवाडी 2 किमी, जमदाडवाडी 1.500 किमी, जानुगडेवाडी 0.300 किमी, जाळगेवाडी 4 किमी, जिंती 1.200 किमी, जुंगठी 5 किमी, कुंभारगाव 0.700 किमी, झाकडे 0.500 किमी, टेळेवाडी 5 किमी, ठोमसे 3.800 किमी, तळीये 1 किमी, वाघणे 1 किमी, तांबवे 4.500 किमी, तामकडे 0.900 किमी, तामिणे 2.100 किमी, तारळे 13 किमी, तोरणे 5 किमी, दक्षिण तांबवे 2 किमी, दिक्षी 0.300 किमी, देशमुखवाडी 0.500 किमी, धडामवाडी 1.500 किमी, धामणी 3 किमी, धुईलवाडी 1.300 किमी, नवजा 1.500 किमी, नवारस्ता 0.250 किमी, नहिंबे चिरंबे 1.500 किमी, नाटोशी 3 किमी, नाडे 1.150 किमी, नारळवाडी 3 किमी, नावडी 2 किमी, निवकणे 1 किमी, निसरे 0.500 किमी, पवारवाडी 3 किमी, पाचगणी 1.300 किमी, पाठरवाडी 2 किमी, पाडळोशी 3.500 किमी, पापर्डे 2.500 किमी, पेठशिवापूर 0.400 किमी, धनगरवाडा मरड 5.700 किमी, भिकाडी 2 किमी, रामेल 1.500 किमी, फडतरवाडी 3 किमी, बनपूरी 0.800 किमी, बनपेठवाडी 0.600 किमी, बागलेवाडी 2 किमी, बिबी 0.700 किमी, बेलवडे 1 किमी, बोडकेवाडी 1 किमी, बोर्गेवाडी डेरवण 2 किमी, भरेवाडी 3 किमी, भालेकरवाडी 0.400 किमी, भोळेवाडी 0.800 किमी, भोसगाव 2 किमी, मंद्रुळकोळे 1.500 किमी, मंद्रुळहवेली 0.500 किमी, मणदुरे 5 किमी, मणेरी 2 किमी, मत्रेवाडी 2 किमी, मरड 1.500 किमी, मराठवाडी 1.500 किमी, मल्हारपेठ 4 किमी, महिंद 1.300 किमी, माजगाव 6.200 किमी, माथणेवाडी 1.900 किमी, मान्याचीवाडी 3.600 किमी, मारुल तर्फ पाटण 2 किमी, मारुलहवेली 1.500 किमी, मालदन 2 किमी, माळवाडी 4 किमी, मुळगाव 0.200 किमी, मेंढोशी 1.800 किमी, मोरगिरी 1.200 किमी, मोरेवाडी 0.700 किमी, मौजे साकुर्डी 1.500 किमी, म्हारवंड 10.650 किमी, म्होप्रे 1.500 किमी, येरफळे 10.27 किमी, येराड 4 किमी, येराडवाडी 1.500 किमी, येळेवाडी 5 किमी, रासाटी 2 किमी, रिसवड 0.700 किमी, लेंढोरी 1.500 किमी, वांझोळे 0.500 किमी, वाटोळे 1.500 किमी, वाडीकोतावडे 1 किमी, विहे 3.200 किमी, वेखंडवाउी 3 किमी, वेताळवाडी 1 किमी, शितपवाडी 0.800 किमी, शिरळ 2.100 किमी, शेंडेवाडी 2 किमी, शेडगेवाडी 2.400 किमी, संभापूर 0.400 किमी, सणबूर 1.600 किमी, साखरी 0.500 किमी, साजूर 1.500 किमी, सुतारवाडी 2 किमी, सुपने 0.300 किमी, सुरुल 0.800 किमी, सोनाईचीवाडी 2.500 किमी, हुंबरणे 0.500 किमी या गावांतील पाणंद रस्त्यांच्या कामांचा समावेश असून या शेत/पाणंद रस्त्यांच्या कामांना सुरुवात होणार असल्याचे शेवटी पत्रकांत म्हंटले आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker