Rain News : कोयनेत पावसाचा हाहाकार, आज सतर्कतेचा इशारा
Rain News (Koyna) – सातारा जिल्ह्यात पश्चिमेकडे पावसाचा हाहाकार सुरू असून कोयना धरण परिसरात पडत असलेल्या जोरदार पावसामुळे कोयना धरण 54.42 टीएमसी भरले असून कोयना परिसरातील अोझर्डे धबधब्यासह अनेक धबधबे डोंगर दऱ्यातून भरून वाहू लागले आहेत. कोयना धरणात सध्या 42 हजार क्युसेस पाण्याची आवक सुरू आहे. गेल्या 24 तासात महाबळेश्वर- 158 मिलीमीटर, नवजा- 127 तर कोयनेला 107 मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याचे धरण व्यवस्थापनाने सांगितले आहे. तर मुंबई एआरडी विभागाने आज सातारा जिल्ह्याला सतर्कतेचा इशारा दिला आहे.
हवामान माहिती- दिनांक 21/07/2024 रोजी सकाळी 0900 वाजता जारी करण्यात आलेली नुकतीच चेतावणी: धुळे बीड कोल्हापूर सातारा जिल्ह्यांमध्ये पुढील 3-4 तासांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. -आयएमडी मुंबई
गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्यात समाधानाचे वातावरण आहे. तसेच कोयना धरणात पावसाची संततधार सुरू असल्याने धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे. कोयना नदी पात्रातील पाणी पातळी वाढत असल्याने शेतकऱ्यांनी तसेच नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये, असे आवाहन करण्यात येत आहे.