माथाडींचा लढवय्या… मा. आ. नरेंद्र आण्णासाहेब पाटील

अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी होतोय साजरा या निमित्त त्यांच्या कार्याचा आढावा…
आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील हे माथाडींचे आराध्यदैवत स्व. आमदार अण्णासाहेब पाटील यांचा आचार, विचार आणि मुर्तीमंत स्वरुप असलेले, माथाडींच्या न्यायासाठी सतत तीव्र लढा देणारे नेतृत्व….

कष्टाची कामे करुन आपला उदरनिर्वाह करणा-या कष्टकरी माथाडी कामगारांची स्व. आमदार अण्णासाहेब पाटील यांनी उभी केलेली कामगार चळवळ, माथाडी कामगार संघटना केंद्रबिंदू मानून त्यांच्या न्याय हक्कासाठी तीव्र लढा देणारे माथाडींचे न्याय्य प्रश्न सोडविण्यासाठी सतत धाडशी, अष्टपैलू नेतृत्व आणि महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे नेते सरचिटणीस, युवा नेते, महाराष्ट्र विधानपरिषदेचे माजी आमदार व शासनाच्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष (मंत्री दर्जा) मा. नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांना वाढदिवसानिमित्त सर्वप्रथम मनःपूर्वक हार्दीक शुभेच्छा. माथाडींचे भाग्यविधाते व आराध्यदैवत कै. आमदार अण्णासाहेब पाटील यांनी मुंबईसारख्या धनिकांच्या नगरीमध्ये कष्टक-यांना ताठ मानेने उभे केले, माथाडी कामगारांकरीता माथाडी कायदा केला, माथाडी बोर्डाच्या स्थापना केल्या, कामगारांसाठी माथाडी पतपेढी, माथाडी ग्राहक सोसायटी, माथाडी हॉस्पीटलची स्थापना केली, माथाडी घरकुल योजना राबविल्या, कष्टकरी माथाडी कामगार व त्यांच्या कुटुंबियांच्या जीवनाला स्थैर्य प्राप्त करुन दिले.

अण्णासाहेबांनी दुरदृष्टी ठेवून केलेले महान कार्य कष्टकरी माथाडी कामगार केंव्हाही विसरु शकणार नाही. आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या निधनानंतर कै. शिवाजीराव पाटील, के. संभाजीराव पाटील यांनी सरचिटणीस पदाची धुरा सांभाळली. या दोघांच्या निधनानंतर स्व. आमदार अण्णासाहेब पाटील यांचा आचार, विचार व त्यांच्या ध्येय-धोरणानुसार आमदार मा. नरेंद्र अण्णासाहेब पाटील हे युनियनच्या सरचिटणीस या प्रमुख पदाची धुरा सांभाळत आहेत माथाडी कामगारांवर ओढविणा-या प्रत्येक संकटावर रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याची धमक माथाडी कामगार नेते मा. नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांचेत असून, त्यांनी मॉल संस्कृतीमुळे व शासनाच्या नवीन धोरणामुळे माथाडी कामगारांच्या होणा-या नुकसानीच्या विरोधात आवाज उठवून अनेक वेळा मोर्चा, मोटर सायकलवरुन आंदोलन केले. आज माथाडी संघटनेचे कार्य महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यामध्ये नेण्याचा प्रयत्न करुन कष्टकरी कामगारांना माथाडी कायदा व बोर्डाच्या योजनेचे फायदे मिळवून देण्याचा प्रयत्न मा. नरेंद्र अण्णासाहेब पाटील करीत आहेत.
युनियनचे बृहन्मुंबई, ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्याबरोबर नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, लातूर इत्यादी जिल्ह्यामध्ये संघटनेचे कार्य सुरु आहे. कै. आमदार अण्णासाहेब पाटील यांचे अखिल भारतीय मराठा महासंघाचे कार्य मा. नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी संपुर्ण महाराष्ट्रभर दौरे करुन पुन्हा जोमाने सुरु केले. मराठा समाजाला आर्थिक निकषावर आरक्षण मिळावे हे अण्णासाहेबांचे स्वप्न साकार होण्यासाठी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या माध्यमातून नरेंद्र पाटील यांनी मराठा आरक्षण मेळावे घेऊन हा लढा पुढे चालू ठेवला. ग्रामीण भागात व बृहन्मुंबई, ठाणे, रायगड जिल्हा विभागात मराठा महासंघाच्या अनेक शाखा स्थापन करुन कार्यकर्त्यांची एकसंघ शक्ती निर्माण केली.
मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी काढण्यात आलेल्या मोर्चात सक्रीय सहभाग घेतला. माजी आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी माथाडी कामगारांच्या कामकाजाबरोबर सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक धार्मिक कार्यात देखिल हिरहिरीने भाग घेतला आहे, असे अनेक कार्यक्रम त्यांनी राबविले. स्व. आमदार अण्णासाहेब पाटील यांना विधानपरिषदेवर संधी देण्यात आली होती, त्यानंतर सन २०१२ मध्ये माथाडी कामगार नेते नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांना महाराष्ट्र विधानपरिषदेवर काम करण्याची संधी मिळाली, यामुळे अण्णासाहेबांच्या कार्याचा, युनियन, पदाधिकारी आणि तमाम माथाडी कामगारांचा गौरव झाला.
माथाडी कामगारांचे आराध्यदैवत स्व. आमदार अण्णासाहेब पाटील यांनी माथाडी चळवळ उभी केली आणि त्यांच्या अव्दितीय सामाजिक कार्याची दखल योग्य वेळी घेण्यात आली. माथाडींचे आराध्यदैवत स्व. आमदार अण्णासाहेब पाटील यांनी स्थापन केलेली कामगार चळवळ ही एक स्वतंत्र ताकद आहे. ही चळवळ उभी करण्यासाठी आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतरावजी चव्हाण, स्व. वसंतदादा पाटील, स्व. वसंतराव नाईक, स्व. लोकनेते बाळासाहेब देसाई आणि मा. शरदचंद्रजी पवारसाहेब यांनी स्व. आमदार अण्णासाहेब पाटील यांना मोलाची साथ दिली. बदलत्या परिस्थितीत माथाडी कामगारांवर अनेक संकटे आली, या संकटावर संघटनेने समर्थपणे मात केली. माजी आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी माथाडी कामगारांच्या हितासाठी अनेक धाडसी निर्णय घेतले. केंद्र व राज्य सरकारने पणन, सहकार व कामगार खात्याअंतर्गत असलेल्या कायद्यामध्ये बदल करण्याची भुमिका घेतली. शासनाचे हे धोरण राबवित असताना वर्षानुवर्षे कष्टाची कामे करणा-या माथाडी कामगारांच्या उपजिवीकेवर परिणाम होऊ नये म्हणून उपाययोजना करण्याची महाराष्ट्र राज्याचे त्यावेळचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस व संबंधित खात्याच्या मंत्र्यांकडे आग्रही मागणी करुन माथाडी कामगारांच्या न्याय प्रश्नांची माहिती दिली. माथाडींचे आराध्यदेवत स्व. आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त दि. २५ सप्टेंबर, २०१६ रोजी वाशी, नवीमुंबई येथिल माथाडी कामगार मेळाव्यास आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांना आणले, दि. २५ सप्टेंबर, २०१७ रोजीच्या मेळाव्यात राजकिय कारकिर्दीस ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल राष्ट्रिय नेते मा. शरदंचदजी पवारसाहेब यांना आणून त्यांचा तमाम माथाडी कामगारांतर्फे भव्य सत्कार केला.
आमदार स्व. अण्णासाहेब पाटील यांनी स्थापन केलेल्या एकसंघ बलाढय अशा माथाडी कामगार चळवळीची ताकद मुख्यमंत्री व शासनातील अन्य मंत्र्यांपर्यंत पोहचविण्याचे कार्य आमदार नरेंद्र पाटील यांनी केले. माथाडी कामगार चळवळीच्या इतिहासात नोंद होईल, असा भव्य मेळावा यशस्वी केला. माथाडी कामगारांच्या धोरणात्मक प्रश्नाबरोबर दैनंदिन प्रश्नांची सोडवणुक होण्याकरीता माजी आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, संबंधित खात्याच्या मंत्री महोदय यांना निवेदने सादर केली, यासंदर्भात संयुक्त बैठका झाल्या, माथाडींच्या न्याय प्रश्नांची सोडवणुक करण्याचा आग्रह त्यांनी मंत्री महोदय यांचेकडे केला. कांही प्रश्नांची सोडवणुक शासनाकडून करुन घेतली. महाराष्ट्र विधानपरिषदेवर आल्यानंतर मा. नरेंद्र पाटील यांनी त्यांचे मूळ गांव असलेल्या पाटण तालुक्यातील गांवाना त्याचबरोबर महाराष्ट्रातील विविध जिल्हे, तालुक्यातील गांवाना विकास निधी देऊन स्व. आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या सामाजिक कार्याचा वारसा जतन करण्याचे कार्य केले आहे. स्व. आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या सामाजिक कार्याचा वारसा जतन करताना आमदार नरेंद्र पाटील यांनी नेहमीच प्रथम माथाडी कामगार चळवळ, संघटना व माथाडी कामगारांच्या सुख-दुःखासाठी कार्य करण्याची ठाम भुमिका ठेवली. माजी आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांच्या धर्मपत्नी डॉ. सौ. प्राची नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक, शैक्षणिक व महिला कल्याणासाठी स्थापन करण्यात आलेल्या “प्राना” फाऊंडेशन (रजि.) या संस्थेच्या माध्यमातून रक्तदान, आरोग्य शिबीर, रोजगार मेळावे, महिलांचे हळदी-कुंकू कार्यक्रम, मार्गदर्शक शिबीरे आयोजित केली जातात, प्राना फाऊंडेशनच्या कार्यास माजी आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांचे नेहमी सहकार्य आहे.
माजी आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांना शासनाच्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या अध्यक्ष पदावर काम करण्याची संधी देण्यात आली, संपुर्ण महाराष्ट्रभर तालुके व जिल्ह्यांचे दौरे करुन नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी १,००,००० मराठा उद्योजक करण्याचे अत्यंत उल्लेखनिय असे कार्य केले. कै. आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या आचार, विचार, उच्चारांबरोबर त्यांच्या सद्कार्याचे मुर्तीमंत प्रतिबिंब असलेले युवा नेतृत्व मा. श्री. नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांना कामगार चळवळीच्या रक्षणासाठी आणि महाराष्ट्र विधानपरिषदेच्या आमदार पदी कार्य करण्यासाठी शक्ती, युक्ती आणि भक्ती यांचे पाठबळ लाभून त्यांचे प्रतिभाशाली नेतृत्व चंद्रसुर्यासारखे प्रकाशमान राहो, त्यांना दिर्घायुरोग्य व त्यांच्या कार्याला पदोपदी यश मिळो, याच कोटी-कोटी हार्दीक शुभेच्छा.