सह्याद्री साखर कारखाना : निवास थोरातांचा अर्ज वैध, आता हातमिळवणी की स्वतंत्र?

कराड:- कराड तालुक्यातील सह्याद्री साखर कारखाना निवडणूकीत अवैध ठरवलेल्या 10 अर्जावर पुणे प्रादेशिक सहसंचालकांनी 9 अर्ज वैध असल्याचा निकाल दिला. वैध ठरलेले सर्व उमेदवार माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे समर्थक आहेत. तर सत्ताधारी गटाचे विद्यमान संचालक मानसिंगराव जगदाळे यांचा अर्ज अवैध ठरला. काँग्रेस कराड तालुका अध्यक्ष निवास थोरात आता कोणाशी हातमेवणी करणार की स्वतंत्रपणे उभे करणार?
वैध अर्ज ठरलेले उमेदवार पुढीलप्रमाणे :- बाबुराव पवार (बेलवडे हवेली), संदीप पाटील (उत्तर तांबवे), जयश्री पाटील (सुपने), अधिकराव माळी (सुपने), निवास थोरात (नडशी), सिंधुताई जाधव (पाडळी- हेळगाव), श्रीकांत जाधव (गोवारे), प्रतापराव यादव (कडेपूर), दिलीप कुंभार (तळबीड),
गेल्या आठ दिवसापासून सह्याद्री सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी सातारा, सांगली जिल्ह्यातील कारखाना कार्यक्षेत्रात चांगलेच राजकारण तापलेले पाहायला मिळत आहे. सत्ताधारी गटाचे विद्यमान चेअरमन, माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील आणि विरोधातील सह्याद्री परिवर्तन पॅनेलचे विद्यमान आमदार मनोज घोरपडे यांच्याकडून प्रचाराला सुरुवात केली आहे. मात्र, काँग्रेस समर्थक निवास थोरात यांचा अर्ज छाननीत ठरवल्याने राजकीय तर्कवितर्क लढवले जात होते. निवास थोरात यांनी पुणे प्रादेशिक सहसंचालक यांच्याकडे दाद मागितली होती. यावरती आज निकाल झाला, त्यामध्ये निवास थोरात यांच्यासह नऊ जणांचे अर्ज वैध ठरवले. तर मानसिंगराव जगदाळे यांचा अर्ज अवैध ठरवल्याने सत्ताधारी गटाला हा धक्का मानला जात आहे.