निनाम पाडळीच्या 6 वर्षाच्या चिमुकलीची 4 किल्ल्यावर चढाई

मसूर प्रतिनिधी | गजानन गिरी
निनाम पाडळी येथील ओवी प्रशांत ढाणे या सहा वर्षाच्या चिमुकलीने छत्रपती शिवाजी महाराज यांचे 4 किल्ल्यांची पायी चढाई केली. आता ती पाचवा किल्ला हरिहर याठिकाणी जाणार आहे. तिच्या या धाडसी कार्याला कराड उत्तरचे भाजपचे नेते मनोजदादा घोरपडे यांना शुभेच्छा दिल्या तसेच तिचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कारही केला. ओवी ढाणे या चिमुकलीने आतापर्यंत कर्नाळा किल्ला (पनवेल), वासोटा किल्ला (सातारा), कळसूबाई आणि हरिश्चंद्रगड अहमदनगर असे चार किल्ले तिने पायी चढाई केले.
यावेळी भाजपचे कराड उत्तरचे नेते मनोजदादा घोरपडे, धैर्यशील कदम, भाजपच्या सातारा जिल्हा सचिव दिपाली खोत, सुनिल शिंदे, कराड उत्तर विस्तारक शहाजी मोहिते, कराड उत्तर सरचिटणीस, सरपंच अमर ढाणे लखन साळुंखे, जालिंदर ढाणे, मचिंद्र ढाणे, पी वाय ढाणे, अशोक ढाणे, संजय ढाणे, ॲड. राहुल ढाणे, गजानन ढाणे, रेश्मा ढाणे, संगीता घोलप, राजेन्द्र लोहार,अतुल जगदाळे उपस्थित होते. या चिमुकलीला लागेल ती मदत भारतीय जनता पार्टी करेल असे आश्वासन यावेळी देण्यात आले. अहिल्याबाई होळकर पुरस्काराने सन्मानित पाडळी गावच्या रंजना आनंदराव ढाणे व केशरी कृष्णा ढाणे यांचाही सत्कार करण्यात आला.
मनोज घोरपडे म्हणाले, महाराष्ट्र महापुरूषांचा, साधु- संताचा आहे. या मातीत अनेक रत्ने निर्माण झाली, त्यांनी आपल्या गावाचे नाव देशात नव्हे तर परदेशातही चमकवले. कराड उत्तर मतदार संघातील प्रत्येक तरूण घडावा. त्याच्यातील गुणांना वाव मिळावा, यासाठी मी सदैव तरूणांच्या सोबत आहे. तरूणांनी अभ्यासोबत कला, क्रिडा, सांस्कृतिक क्षेत्रातही आपले करिअर करावे.