ताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराज्यसातारा

कृष्णा नदीपात्रात बुडून 7 वर्षाच्या मुलाचा मृत्यू

कराड | रेठरे बुद्रुक येथील पहिलीत शिकणाऱ्या मुलाचा कृष्णा नदीच्या पात्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सायंकाळी उशिरा घडली. अफराज तय्यब सुतार (वय- 7) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.

याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, अफराज हा त्याच्या मित्राबरोबर कृष्णा नदीच्या काठावर विटी दांडूने खेळत होता. अफराज याच्याकडे वाजवायची शिट्टी होती. शिट्टी नदीपात्रात पडल्याने ती काढत असताना अफराजचा पाय घसरला व तो नदीपात्रात पडला. तो पाण्यात बुडालेचे पाहून त्याचे मित्र घाबरले.

मित्रांनी अफराज पडल्याची घटना घरी व शेजाऱ्यांनाही सांगितली. लोकांनी नदीकडे धाव घेतली व पाण्यात बुडालेला अफराजला बाहेर काढून उपचारासाठी खासगी हॉस्पिटल येथे नेले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तो मृत झाल्याचे सांगितले. तालुका पोलिस ठाण्यात झाली असून, हवालदार रोहित पाटील तपास करत आहेत.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker