पाटण पोलिस ठाण्यात सुषमा अंधारेंवर IPC 500 नुसार गुन्हा दाखल
पाटण | ललीत पाटील प्रकरणामध्ये सुषमा अंधारे यांनी थेट शंभूराज देसाई यांच्यावर आरोप करत नार्को टेस्टची मागणी केली होती. यानंतर एकच गदारोळ माजला होता. आज पाटण पोलिस ठाण्यात सर्वधर्मीय नागरिकांकडून सुषमा अंधारे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार पाटण पोलिसांनी शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर IPC 500 कलमानुसार अब्रू नुकसानीचा अदखलपात्र गुन्हा करण्यात आला आहे.
पाटण विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे नाव सुषमा अंधारे यांनी ललित पाटील ड्रग्स प्रकरणात घेतले होते. सरकारमधील मंत्री असलेले दादा भुसे आणि शंभूराज देसाई यांच्यावर आरोप केल्याने राजकारण चांगलेच तापले. मात्र, सुषमा अंधारे यांच्या सर्व आरोपांच खंडण करत त्यांच्या बाबतीतलं वक्तव्य हे माझ्यासाठी हास्यास्पद आहे. ललीत पाटील कोण हे मला माहित नाही. त्यांना मी ओळखत सुद्धा नाही, केवळ मंत्र्यांना बदनाम करणं त्यांची प्रतिमा खराब करणं हेच काम सुषमा अंधारे करत आहेत. त्यांनी त्यांच वक्तव्य 24 तासांत मागे घ्यावे, असं श्री. देसाई यांनी सांगितलं होतं. त्यांनी कायदेशीर प्रक्रीयेला समोरं जाण्याची तयारी ठेवावी असं थेट इशारा सुद्धा शंभुराज देसाई यांनी सुषमा अंधारे यांना दिला होता.
यानंतर सुषमा अंधारे यांनी त्यांच वक्तव्य मागं न घेतल्यामुळं शंभुराज देसाई यांची बदनामी केल्या प्रकरणी पाटण तालुक्यातील सर्व धर्मीय-सर्व जातीय नागरीकांकडुन सुषमा अंधारे यांच्या विरोधात पाटण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी यात करण्यात आली आहे. त्यानुसार पाटण पोलिसांनी सुषमा अंधारे यांच्यावर IPC 500 कलमानुसार अब्रू नुकसानीचा अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक संदिप कामत करत आहेत.