ताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराजकियराज्यसातारा

Election : कोळेवाडीत रयत पॅनेलचा एकहाती मोठा विजय

कराड | कोळेवाडी विकास सेवा सोसायटीत अॅड. उदयसिंह पाटील- उंडाळकर, माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण व कृष्णा कारखान्याचे माजी चेअरमन अविनाश मोहिते यांच्या गटाने सत्ता अबाधित राखत विरोधकांचा 13- 0 असा धुव्वा उडवला. सत्ताधारी गटाने विरोधी उमेदवारांचा तब्बल 275 ते 300 मतांच्या फरकाने पराभव केला.

विजयी उमेदवार व कंसात मते- सर्वसाधारण गटातून ः- कृष्णत राजाराम टेळे (353), दिलीप निवास देसाई (372), मोहन बाबुराव पाटील (345), सचिन आत्माराम पाटील (373), सुरेश बाबुराव पाटील (359), शिवाजी दत्तू शिंदे (360), संजय शंकर शिंदे (355), तानाजी पांडुरंग साळुंखे (349). महिला राखीव गटातून ः- लता प्रकाश जाधव (382), सुमन संपत पाटील (365)
तर बिनविरोध 3 गटातून पुढील उमेदवार बिनविरोध निवडूण आलेले आहेत. अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातून ः- श्रीरंग निवृत्ती कांबळे इतर मागास प्रवर्गातूनः- शब्बीर आदम मुल्ला. भटक्या विमुक्त मतदार संघातूनः- भीमराव जगन्नाथ लोहार

Shree Furniture karad

विजयी उमेदवारांच्या पतीच्या निधनामुळे जल्लोष नाही
सत्ताधारी रयत पॅनेलचे नेतृत्व माजी पंचायत समिती उपसभापती रमेश देशमुख, वसंतराव भोसले यांनी केले. विरोधी पॅनेलच्या उमेदवारांना अवघी 50 ते 60 मते मिळाल्याचे दिसून आले. त्यामुळे एकहाती सत्ता सत्ताधाऱ्यांना देत असताना विरोधकांना सभासदांनी नाकारले. विजयी उमेदवार लता प्रकाश जाधव यांचे पती प्रकाश शंकर जाधव यांचे अल्पशा आजाराने निधन झाल्याने विजयी पॅनेलने कोणताही जल्लोष केला नाही.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker