साताऱ्यातील वाहतुकीसाठी कलेक्टर आले रस्त्यावर : एसटी व्यवस्थापनाला दणका
उद्यापासून तिसऱ्या गेटचे काम सुरू होणार

सातारा प्रतिनिधी/ वैभव बोडके
बस प्रशासनाच्या आर्मूटपणामुळे सातारा शहरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत होती. यासाठी अनेकवेळा सातारा वाहतूक शाखा आणि सातारा नगरपालिका यांच्या माध्यमातून व्यवस्था नीट करण्यासाठी मोठे प्रयत्न करण्यात आले होते. परंतु , दरवेळी सातारा बस व्यवस्थापन कोणते ना कोणते कारण काढून ते टाळत होते. अखेर आज सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी थेट रस्त्यावर येऊन वाहतुकीची पाहणी करत बस प्रशासनाला नवीन बॅक गेट काढण्याचे आदेश दिले आहेत.
यावेळी जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, नगरपालिका मुख्याधिकारी अभिजीत बापट, डीवायएसपी सूर्यवंशी, वाहतूक नियंत्रण शाखेचे अधिकारी अभिजीत यादव त्याचबरोबर बस स्थानक अधिकारी इतर प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
तिसरे गेट सुरू केल्यानंतर वाहतुकीची चिंता मिटणार
परंगे चौकाच्या बाजूला नवीन बॅक गेट होणार आहे. महामंडळाच्या पुणे, मुंबई, महाबळेश्र्वर, मेढा, फलटण आणि इतर ठिकाणी जाणाऱ्या गाड्यांसाठी नवीन बॅक गेट जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने काढण्यात येणार आहे. उद्यापासून तिसऱ्या गेटचे काम सुरू होणार आहे.