अर्जुन पुरस्कार मिळवणारी सातारा जिल्ह्यातील पहिली खेळाडू ”आदिती स्वामी”
सातारा प्रतिनिधी | वैभव बोडके
सातारा तालुक्यातील शेरेवाडी येथील आदिती गोपीचंद स्वामी ही क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च ‘अर्जुन पुरस्कार’ मिळविणारी सातारा जिल्ह्यातील पहिली खेळाडू ठरली. क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च अर्जुन पुरस्कार मिळविण्याचे स्वप्न उराशी बाळगून खेळातील वाटचाल सुरू ठेवली होती. ते स्वप्न साकार झाल्याची प्रतिक्रिया आदितीने बोलताना व्यक्त केलीय. आज ती शिक्षण घेत असलेल्या .साताऱ्यातील लाल बहादूर शास्त्री या कॉलेजमध्ये तिच्या शिक्षकांनी या यशामुळे तिच्या आईचे आणि तिचे सत्कार करून तोंड भरून कौतुक केलंय आहे.
आदिती ही अत्यंत कमी वयात जागतिक पातळीवर सर्वोच्च कामगिरी करणारी खेळाडू आहे. 2023 मध्ये जागतिक तिरंदाजी स्पर्धेत कम्पाऊंड तिरंदाजीमध्ये तिने देशाला सुवर्णपदक मिळवून दिले.जागतिक करंडक स्पर्धेत 2006 नंतर सुवर्णपदक मिळवणारी ती सर्वांत लहान वयाची खेळाडू ठरली होती. आदितीने भारताला 14 वर्षांनंतर वर्ल्ड कपमध्ये 720 पैकी 711 गुण मिळवून वर्ल्ड रेकॉर्ड करून भारताचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिले आहे. भारताला एशियन गेम्स, एशियन चॅम्पियनशिप, वर्ल्ड कप अशा अनेक स्पर्धांमधून तिने सुवर्णपदके मिळवून दिली आहेत.
आदिती स्वामीची कामगिरी
आशियाई गेम्स 2022 चीन – 1 सुवर्ण, 1 कांस्यपदक.
आशियाई चॅम्पियनशिप बँकॉक – 2 सुवर्णपदक
युथ चॅम्पियनशिप – आयर्लंड (लीमरिक) 2 सुवर्णपदक
वर्ल्ड सीनियर चॅम्पियनशिप जर्मनी (बर्लिन) – 2 सुवर्णपदक
वर्ल्ड कप 1 अंटलिया (टर्की)