तांबवेत 23 वर्षांनी माजी विद्यार्थी व शिक्षकांचा स्नेहमेळावा उत्साहात

कराड | तांबवे येथील अण्णा बाळा पाटील विद्यालयात एस. एस. सी बॅच 1998 /99 च्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी 23 वर्षानंतर आयोजित स्नेहमेळाव्यास 100 माजी विद्यार्थी उपस्थित राहिले होते. या मेळाव्यात सर्व आजी-माजी गुरुवर्य यांचा सत्कार सन्मान सोहळा करण्यात आला. या कार्यक्रमास माजी मुख्याध्यापक एम.जे. पाटील हे अध्यक्षस्थानी होते.

यशंवत एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष निवासराव पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक एस. व्ही. पोळ, सेवानिवृत्त शिक्षक डी. के. देसाई, ए. व्ही. लोटके, एम. ई. अवघडे, एन. जे. पाटील, एच. पी. पवार, आर. टी. डोंबे, व्ही. वाय. फल्ले, बी. जी. थोरात, बी. बी. शिंदे, आर. आर. पाटील, के. के. वरेकर, व्ही. ए. पवार, बी. एम. सुर्यवंशी, पी. जी. गायकवाड, डी. डी. लोखंडे, आर. बी. चव्हाण, आप. पी. ढगाले, व्ही. व्ही. देसाई, प्रसाद कुलकर्णी यांच्यासह शिक्षक व शिक्षकत्तेर कर्मचारी उपस्थित होते.

या आयोजित कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी सर्व माजी शिक्षक आणि माजी विद्यार्थी यांच्यावरती फुलांचा वर्षाव करत सर्वांचं कार्यक्रम स्थळी स्वागत करण्यात आलं. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली. मेळाव्यात शामला देसाई, स्वाती जाधव, मंगेश देवकर, जयवंत देसाई, सतीश यादव या माजी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच सेवानिवृत्त शिक्षक बाळासाहेब शिंदे, राजाराम डोंबे, डि. के. देसाई, श्री. सूर्यवंशी सर, पी. जी. गायकवाड, एच. पी. पवार यांनी मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी शाळेला भेटवस्तू म्हणून 1998/ 99 बॅचच्या सर्व विद्यार्थ्यांनी शाळेची नेमप्लेट स्टीलच्या अक्षरांमध्ये करून दिली. प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन सतीश यादव यांनी केले. आभार प्रकाश देवकर यांनी मानले.
शनिवारी 13 मे रोजी 2001- 2002 सालच्या बॅंचचा स्नेहमेळावा
स्वा. सै. आण्णा बाळा पाटील विद्यालयाच्या 2001- 2002 सालच्या दहावीच्या अ व ब तुकडीच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याचे आयोजन शनिवार दिनांक 13 मे रोजी बेलदरे येथील आपलं गाव याठिकाणी करण्यात आले आहे.



