शिवसेनेची मते भाजपाकडे वळविण्याचे टार्गेट : विनोद तावडे
कराड प्रतिनिधी | विशाल वामनराव पाटील
आगामी 2024 लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून निवडणूक तयारी सुरू असल्याने लोकसभा प्रवास योजना सुरू आहे. 2014 विधानसभा सर्वच पक्षांनी वेगळी लढली होती. यावेळी भाजपाला 29 टक्के, शिवसेनेला 19 टक्के, काॅंग्रेसला 18 टक्के, राष्ट्रवादीला 17 टक्के मते पडली. यामध्ये शिवसेनेची 19 टक्के मते जी आहेत. त्यामधील 8 ते 10 टक्के मते हिंदुत्वाची आहेत. मात्र, 2019 नंतर राममंदिरला विरोध करणारे काॅंग्रेस आणि हिदुत्वाला विरोध करणाऱ्या एनसीपीसोबत जावून शिवसेनेची 8 ते 10 टक्के मते खिळखिळी झालेली आहेत. ती मते भाजपाकडे वळविण्याचे टार्गेट भारतीय जनता पक्षाचे असेल. सध्या असलेली 29 टक्के मताचे रूपांतर 45 टक्केपर्यंत जाण्यास मदत होईल असा विश्वास भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी व्यक्त केला.
कराड येथे लोकसभा प्रवास योजनेअंतर्गत आयोजित भाजपा कोअर टीमच्या बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी प्रदेश सचिव विक्रम पावसकर, सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले, धैर्यशील कदम, मनोज घोरपडे, रामकृष्ण वेताळ आदी उपस्थित होते. पुढे विनोद तावडे म्हणाले, राज्यातील बदललेली राजकीय समीकरणे पाहता, थोडी अधिक ताकद लावली तर वेगळं चित्र दिसू शकतं. दिल्लीचा मंत्री गल्लीत जात मोदी सरकारने ज्या योजना आखल्या आहेत. त्या गावपातळीवर किती पोहोचल्या आहेत, यांचा आढावा घेत आहोत. 48 पैकी 18 लोकसभा मतदारसंघात भाजप दोन नंबरवर आहे. तेथे थोडे लक्ष घातल्यास तेथील निकाल वेगळा लागू शकतो.
विनोद तावडे यांची पत्रकार परिषदेत उत्तरे
सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात भारतीय जनता पक्ष एनडीए मजबूत होण्यासाठी प्रयत्न करत आहे. भाजपाच्या कार्यकर्त्याने काम केले तरी तिथे एनडीएतून जो उमेदवार असेल त्यालाच फायदा मिळणार आहे. उमेदवार कोणाचा हे निवडणुकीच्या अगोदर 5-6 महिने ठरेल, आता नाही.
बाळासाहेब ठाकरेंनी जी हिदुत्वांची भूमिका मांडली, ती 2019 नंतर झालेल्या राजकारणामुळे दिसत संपुष्टात आणण्याचे दिसतयं.काॅंग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसण्याने उध्दव ठाकरे यांची शिवसेना कमकुवत झालेली आहे. पुन्हा केंद्रात मोदीच्या नेतृत्वात सरकार आले पाहिजे, यासाठी भाजपाचा कार्यकर्ता ताकदीने काम करेल.
भाजप – मनसे आज तरी युती नाही. एका सभेमुळे किंवा एखादी भूमिका घेतल्यामुळे मते फुटतात. भाजपा आणि शिवसेना हिंदुत्ववाची भूमिका घेत होती. आता शिवसेनेने ती भूमिका सोडली, आता कुठलं हिदुत्व पक्क आहे.
मी नाराज नाही. भारतीय जनता पक्षात नेतृत्व आणि पक्ष ठरवतं काय काम करायचं. लोकसभा व विधानसभा एकत्रित लागणार नाही.