कृषीक्राइमताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रब्रेकिंगराजकियराज्यसातारा

अजित दादांच्या सावकारांनी मला संपवलं, फडणवीस साहेब न्याय द्या : साताऱ्यात शेतकऱ्यांची मागणी

पालकमंत्री शंभूराज देसाईच्या घराच्या परिसरात आत्मदहनाचा प्रयत्न

सातारा | खराडेवाडी येथील शेतकऱ्यांने पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या घराच्या परिसरात स्वातंत्र्यदिनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. खाजगी सावकाराने 10 एकर जमीन बळकावल्याचा आरोप शेतकरी सुरेंद्र पांडुरंग जगताप याने केला असून संबधितांवर कारवाई होत नसल्याने आत्मदहन करत असल्याचे शेतकऱ्याने सांगितले. तसेच अजित दादांच्या सावकारांनी मला संपवलं, फडणवीस साहेब न्याय द्या, अशी मागणी संबधित शेतकरी यावेळी करत होता.

आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी शेतकऱ्याने पोवई नाक्यावरील पालकमंत्र्याच्या घराच्या परिसरात आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने पोलिसांची धावपळ उडाली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आत्मदहन करण्यास परवानगी द्या, अशी मागणी संबधित शेतकरी करत होता. तसेच पोलिसांनी पकडल्यानंतर दोषीवर कारवाई करणार असल्याचे पोलिसांनी लेखी लिहून द्यावे, असेही म्हणत होता.

खराडेवाडी येथील शेतकरी सुरेंद्र पांडुरंग जगताप यांची एकूण दहा एकर क्षेत्रातील शेत जमीन खाजगी सावकार संजय निकम, संजय गरुड, दिगंबर आगवणे, गोरख नवले, रूपाली झाडे, प्रमोद धाराशिवकर, शाकीर महात, सुरेखा जगताप, सोमनाथ जगताप व त्यांचे साथीदार यांनी जबरदस्तीने दहा एकर जमीन बळकवली आहे. सन 2016 पासून वारंवार महसूल आणि गृह खात्याला लेखी निवेदन देऊन सुद्धा न्याय न मिळाल्याने आज स्वातंत्र्यदिनी सातारा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या घराच्या परिसरात आत्मदहनाचा प्रयत्न केला.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker