चोराच्या उलट्या बोंबा… अंबादास दानवेंनी अजित दादांना फटकारले
वैभव बोडके | सातारा प्रतिनिधी
अजित दादांनी संविधान पाळावं असं सांगणं म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा अशा पध्दतीने हे आहे. अजित दादांनी खरंतर जरांगे- पाटलांच्या भूमिकेचे स्वागत केले पाहिजे. जरांगे- पाटील ज्या पद्धतीने भूमिका मांडतात आणि समाज त्यांच्या मागे एकवटला आहे. तर त्यांचा अवमान अजित दादांनी करू नये अशी माझी विनंती आहे. तसेच सातारा नव्हे तर राज्यात सर्वच ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाकडून लोकसभेची चाचपणी झाल्याचेही सांगितले. अजित दादांनी संविधान पाळावं असं सांगणं म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असे म्हणत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी फटकारले.
सातारा जिल्ह्याच्या शिवसेना पदाधिकारी यांच्यासमवेत शासकीय विश्रामगृह येथे चर्चा केली. याप्रसंगी शिवसेना उपनेते नितीन बानगुडे पाटील,जिल्हाप्रमुख सचिन मोहिते, हर्षल कदम,संजय विभुते, उपजिल्हाप्रमुख विश्वनाथ धनवडे, दत्तात्रय नलावडे,अमोल आवळे, तालुकाप्रमुख विकास नाळे,सचिन झांझुर्ने व युवासेना जिल्हाधिकारी माऊली पिसाळ उपस्थित होते.
वन नेशन वन इलेक्शन होणार नाही
वन नेशन वन इलेक्शनला काॅंग्रेस पक्षाने विरोध केला होता, आता आम आदमी पक्षानेही विरोध केला आहे. यावर अंबादास दानवे म्हणाले, वन नेशन वन इलेक्शन हा विषय होणारच नाही. मग त्या विषयावर कशाला चर्चा करायची असे म्हणत केवळ फार्स निर्माण केला जात असल्याची टीका केली.
छ. उदयनराजेंनी दानवेंना म्हणाले… साॅरी
सातारा येथील विश्रामगृहावर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आले असल्याची माहिती मिळताच भाजप खा. छ. उदयनराजे भोसले यांनी जावून त्यांची भेट घेतली. यावेळी त्यांचे स्वागतही केले तसेच मुलाच्या लग्नाला आलो नसल्याने उदयनराजे साॅरीही बोलले. जेजुरी येथील कुलदैवत खंडोबाचे दर्शन घेवून साताऱ्याला आलो असल्याचे दानवेंनी सांगितले.