राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना खातेवाटप : अजित पवारांकडे ‘हे’ महत्वाचे खाते
मुंबई । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात यापूर्वी 20 मंत्री होते. आता 2 जुलै रोजी शपथ घेतलेले राष्ट्रवादीचे 9 मंत्री वाढल्याने ही संख्या 29 इतकी झाली आहे. राष्ट्रवादीच्या 9 मंत्र्यांना कोणतीह खाती मिळणार याकडे लक्ष लागून आहे. या 9 मंत्र्यांना आज रात्री खाती जाहीर होणार असल्याची माहिती समोर येत असून उपमुख्यमंत्री अजित पवार येणार अंत्यत महत्वाचे अर्थ खाते देण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे 13 खात्यांचा पदभार आहे तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, अर्थ, जलसंपदा, गृहनिर्माण, ऊर्जा आणि राजशिष्टाचार अशा 6 महत्वाच्या खात्यांचा पदभार समावेश आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेले ‘अर्थ’ हे महत्वाचे खाते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्यात येणार आहे,अशी चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून अर्थ, जलसंपदा आणि ऊर्जा खात्याची मागणी केली गेली असल्याचे सांगितले जात आहे. मुख्यमंंत्री शासन आपल्या दारी या उपक्रमासाठी धुळे दाैऱ्यावर आहेत, तेथून माघारी परतल्यानंतर रात्री उशिरा खातेवाटप होणार आहे.
राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना मिळणारी खाती पुढीलप्रमाणे
छगन भुजबळ – अन्न व नागरी पुरवठा, ओबीसी, बहुजन विकास
दिलीप वळसे पाटील – सहकार
धनंजय मुंडे – सामाजिक न्याय
अदिती तटकरे – महिला व बालविकास
हसन मुश्रीफ – वस्त्रोद्योग, अल्पसंख्याक विकास
संजय बनसोडे – क्रीडा
अनिल पाटील – पशु व वैद्यकीय
धर्मराज बाबा आत्राम – आदिवासी कल्याण