उत्तर महाराष्ट्रकोकणताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रब्रेकिंगमराठवाडामुंबईराजकियराज्यविदर्भसांगलीसातारा

‘एक नोट एक व्होट’ चे पहिले आमदार अनिल बाबर : राजकीय प्रवास…

सांगली | आ. अनिल बाबर 1990 मध्ये खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षातर्फे ते निवडून आले. या निवडणुकीत जनतेने त्यांना ‘एक नोट एक वोट’ देऊन विजयी केले होते. बहुदा महाराष्ट्रातील हा पहिलाच प्रयोग असावा. त्यामुळेच जनतेच्या मतावर आणि निधीवर निवडून आलेले आमदार अशी त्यांची त्या काळात ख्याती होती. ती अखेरपर्यंत कायम राहिली. लोकांनी केलेले प्रेम आपल्या कायम स्मरणात राहील आणि त्यातून उतराई होण्यासाठीच या भागातील माणूस उभा राहिला पाहिजे यासाठी मी टेंभू योजना मांडली असे आमदार बाबर नेहमी म्हणत.

आमदार अनिलराव कलजेराव बाबर यांचा जन्म कराड येथे जन्म 7 जानेवारी 1950 झाला. त्यांचे शिक्षण महात्मा गांधी विद्यामंदिर विटा येथे झाले. 1972 मध्ये त्यांची गार्डीच्या सरपंचपदी निवड होऊन त्यांचा राजकारणात प्रवेश झाला. त्याचवेळी झालेल्या खानापूर पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये सदस्य म्हणून ते निवडून आले. पुढे 1979 मध्ये सांगली जिल्हा परिषदेवर कॉंग्रेस पक्षातर्फे ते निवडून येऊन बांधकाम समिती सभापतिपदी त्यांची निवड झाली. 1982 ते 1990 अखेर त्यांनी खानापूर तालुका पंचायत समितीचे सभापतिपद भूषविले.

1990 च्या काळात विधिमंडळाचे सदस्य म्हणून त्यांनी खानापूर आटपाडी तालुक्यातील दुष्काळी भागाला कृष्णेचे पाणी मिळाले पाहिजे, यासाठी सातत्याने प्रयत्न केले. त्यातूनच त्यांनी टेंभू योजनेची मांडणी केली. या योजनेच्या पूर्ततेसाठी त्यांनी आपले आयुष्य पणाला लावले. त्यामुळेच खानापूर आटपाडी सह टेंभूच्या कार्यक्षेत्रातील लोकांनी त्यांना टेंभू योजनेचे जनक अशी उपाधी दिली. तसेच त्यांनी मतदारसंघामध्ये रस्ते, वीज, जलसंधारण अशी अनेक कामे केली. पुढे 1999 मध्ये त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून निवडणूक लढविली आणि ते विधानसभेचे आमदार झाले. या काळात त्यांनी टेंभू योजनेच्या रखडलेल्या कामांना गती देण्याचा प्रयत्न केला. 2014 च्या विधानसभेवेळी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला व ती निवडणूक जिंकली. 2019 मध्येही ले शिवसेनेतून पुन्हा उमेदवारी घेऊन खानापूर-आटपाडी मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले आहेत, पुढे 2022 मध्ये शिवसेना पक्षातील फूटीनंतर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साथ दिली.

यशवंत सह. साखर कारखान्याचे संचालक म्हणून काही काळ व पुढे संपतराव माने यांच्या निधनानंतर ते चेअरमनपदी निवडून आले होते. सांगली जिल्हा मध्य, सहकारी बँकेवर संचालक म्हणून त्यांनी काम केले आहे. नॅशनल हेवी इंजिनिअरिंगचे अध्यक्ष म्हणून त्यांनी चांगले कार्य केले आहे. जीवन प्रबोधिनीच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रातही ते काम केले आहे. पंचायत राज्य व्यवस्थेचा त्यांचा गाढा अभ्यास होता.

पंचायत समितीचे सभापती असताना पुनर्वसनासाठी कायदा बदलायला लावला
पंचायत समिती, जिल्हा परिषदेमध्ये काम करीत असताना बाबर यांनी ग्रामीण भागातील रस्ते, शाळाखोल्यांचे बांधकाम व दुरुस्ती, पाझर तलाव, नालाबंडिंग इत्यादी जलसंधारणाची कामे तसेच शासनाच्या ग्रामीण विकासाच्या विविध योजनांची तळागाळापर्यंत अंमलबजावणी करण्यासाठी तळमळीने काम केले. भाकुचीवाडी तलाव होत असताना भेंडवडे गावाचे पुनर्वसन करावे लागत होते. त्या कालावधीत अनिल बाबर यांनी सभापती असताना संपूर्ण गावाचे पुनर्वसन करण्याकरिता शासनाच्या धोरणात बदल करण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे भाकुचीवाडी प्रकल्पाला पुनर्वसन कायदा लागू झाला व सर्व गावाच्या संमतीने भाकुचीवाडी प्रकल्पाचे काम मार्गी लागले, तसेच ढवळेश्वर तलाव, येरळा नदीवरील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे यांच्या उभारणीत त्यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker