क्राइमताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रब्रेकिंगमुंबईराजकियराज्यरायगडहवामान

पुन्हा भूस्खलन (landslide) : मातीच्या ढिगाऱ्याखाली 200 ते 250 लोक अडकले, 4 जणांचा मृत्यू

रायगड | मुसळधार पाऊस सुरु असल्याने भूस्खलन झाल्याची घटना समोर आली असून या दुर्घटनेत 4 जण मृत्यू पावले असल्याची माहिती मिळत आहे. या दुर्घटनेमुळे साताऱ्यात दोन वर्षापूर्वी झालेल्या भूस्खलनाची आठवण ताजी झाली आहे. बुधवारी रात्री रायगड (Raigad) जिल्ह्यातील खालापूरजवळील इर्शाळवाडीवर (Irshalgad) (इर्शाळगड ) इथं दरड (Landslide) कोसळल्याची घटना घडली. यामध्ये 200 ते 250 हून अधिक लोक अडकल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. आतापर्यंत 25 लोकांना वाचविण्यात यश आलं आहे. घटनास्थळी मंत्री, गिरीश महाजन, दादा भुसे आणि उदय सामंत यांनी भेट दिली आहे.

इर्शाळवाडीकर येथे रात्री 11 वाजण्याच्या सुमारास ही भूस्खलनाची घटना घडली आहे. रायगड जिल्ह्यामधील इर्शाळवाडी इथं ही घटना घडली आहे. NDRF चे बचावकार्य सुरु आहे. डोंगरावर सतत सुरू असलेला लँड्स लाईड आणि जोरदार पावसामुळे रेस्क्यूमध्ये अडचण निर्माण होत आहे. आता पर्यंत 25 लोकांना रेस्क्यू करण्यामध्ये यश आलं आहे.यात 4 जणांच्या दुर्दैवी मृत्यू झाली आहे. आतापर्यंत 25 लोकांना रेस्क्यू करण्यामध्ये यश आलं आहे. तर यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे.

दोन वर्षापूर्वी पाटण तालुक्यात भूस्खलन
इर्शाळवाडीकर येथे माळीण आणि तळीयेची पुनरावृत्ती झाली आहे. रायगडमधील तळीये आणि माळीण गावावर दरड कोसळून अनेकांचा मृत्यू झाला होता. तळीये गावातील 35 घरांवर दरड कोसळली होती, यामध्ये 44 जणांचा मृत्यू झाला होता. तर माळीणमध्ये 151 जणांनी आपले प्राण गमावले होते. सकाळी माळीण गावावर डोंगर कोसळला, दरड कोसळली आणि मातीच्या ढिगाऱ्याखाली मूळ माळीण गावातील 74 पैकी 44 घरे दबली गेली. जवळजवळ संपूर्ण गाव क्षणार्धात गायब! यामध्ये 151 जणांचा प्राण गेला होता. याच दुर्घटनेची पुनरावृत्ती पुन्हा एकदा झाली आहे. इरशाळगडमधील तीस पेक्षा जास्त घरावर दरड कोसळली आहे. मलब्याखाली 100 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र पावसामुळे मदत कार्यास अडथळा निर्माण होत आहे. एनडीआरएफ आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker