सभासदांच्या कडून माफीनामा, तुमचा करेक्ट कार्यक्रम होणार :- आ. मनोजदादा घोरपडे
सह्याद्री सहकारी साखर कारखाना निवडणूक प्रचार शिगेला

कराड/प्रतिनिधी :- सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या प्रशासनाने शेतकऱ्यांनी अन्यत्र ऊस घातला म्हणून त्यांच्याकडून माफीनामा लिहून घेतला. मालकाकडून विश्वस्तानी माफीनामा लिहून घेण्याचे हे एकमेव उदाहरण असेल त्यामुळे सभासद यांचा करेक्ट कार्यक्रम करणार असल्याचे प्रतिपादन आमदार मनोज दादा घोरपडे यांनी केले. सह्याद्री कारखान्याची निवडणूक दुरंगी होण्यासाठी शेवट पर्यंत प्रयत्न केले पंरतु काहींची भुमिका वेगळी होती. आजवर तिरंगी लढतीचा फायदा ते आमदार होते. त्यामुळे त्यांना झाला. आता मी आमदार आहे. त्यामुळे तिरंगीचा फायदा आम्हाला होणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सताधाऱ्यांना मदत होईल अशी भूमिका घेणे चुकीचे असल्याचे ते म्हणाले.
सह्याद्री सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणूकीच्या अनुषंगाने आयोजित प्रचार बैठकीत शिरवडे ता. कराड येथे ते बोलत होते. यावेळी पै. संतोष वेताळ, राजेंद्र पाटील, सर्जेराव थोरात, दिनकर पाटील, राजेंद्र जगदाळे, कृष्णत थोरात, अनिलराव डुबल, पै. नयन निकम, भावड्या बोराटे व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विकासकामांसाठी 7.50 कोटींचा निधी मंजूर
अवघ्या साडेतीन महिन्यात कराड उत्तर मधील विकास कामांना गती देण्यासाठी यश आले असून कराड उत्तर मधील अनेक गावातील अंतर्गत विकास कामांसाठी 7.50 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. उर्वरित गावांना येणाऱ्या काळामध्ये निधी उपलब्ध करण्यात येईल. असे आमदार मनोजदादा घोरपडे म्हणाले.