सुनिल कदम आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित
सांगली | ग्रुप ऑफ मिडीयाच्या आदर्श पत्रकार पुस्काराने कालेटेक (ता.कराड) येथील पत्रकार सुनिल कदम यांना राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांच्या हस्ते समारंभपुर्वक सन्मानित करण्यात आले. मानपत्र, स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
आष्टा (जि.सांगली) येथे ग्रुप ऑफ मिडीयाच्या वर्धापनदिनानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या व्यक्तींना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंतराव पाटील यांच्या हस्ते राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी दैनिक कर्मयोगीचे पत्रकार सुनिल कदम यांना पत्रकार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल आदर्श पत्रकार पुरस्कार आ.जयंतराव पाटील यांच्या हस्ते समारंभपुर्व प्रदान करण्यात आला.
यावेळी सांगली जिल्हा बँकेचे संचालक वैभवदादा शिंदे, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे उपायुक्त सचिन ढोले, माजी नगराध्यक्ष झुंझारराव पाटील, पोलीस निरीक्षक अजित सिद, ग्रुप ऑफ मिडीयाचे समुह प्रमुख सुनिल पाटील, अध्यक्ष बाबासोा जाधव, संपादक सागर जगताप, कार्यकारी संपादक गौतम माळी, विराजदादा शिंदे, बबनराव थोटे, रघूनाथराव जाधव, सग्राम जाधव, विशाल शिंदे, दिलीपराव वग्याणी आदी मान्यवर प्रमुख उपस्थित होते. दरम्यान, सुनिल कदम यांना आदर्श पत्रकार पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.