टेंभू येथे निर्भया पथकाच्या माध्यमातून जनजागृती रॅली
कराड | टेंभू (ता. कराड) येथे पोलीस उपविभागीय अधिकारी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली निर्भया पथकाच्या माध्यमातून जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी निर्भया पथकाच्या महिला पोलीस दीपा पाटील, प्रिती कांबळे, टेंभूच्या पोलीस पाटील रूबिना मुलाणी, गोपाळ गणेश आगरकर हायस्कूलचे मुख्याध्यापक फैय्याज संदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
आज महिला घर, शाळा, ऑफिस, रेल्वे, पोलीस अशा विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. महिलांमधील धाडस हे मोठे प्रोत्साहन असते. यामुळे महाविद्यालयात शिक्षण घेणार्या मुली, तसेच महिलांचे संरक्षण आणि त्यांच्या आत्मसन्मानार्थ निर्भया पथक कार्यरत आहे. या पथकाकडून 8482913737 हा मोबाईल नंबर सुरु करण्यात आला असून संकटकाळात महिला, विद्यार्थीनींनी पोलिसांशी तात्काळ सदरच्या नंबरवर संपर्क करावा, असे आवाहन निर्भया पथकाच्यावतीने करण्यात आले.
यावेळी कै. गोपाळ गणेश आगरकर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी हातात निर्भया बोर्ड घेऊन गावातून जनजागृती रॅली काढली. या रॅलीत दादासाहेब मोकाशी कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थीनी प्राजक्ता गुरव, सानिका दरेकर, श्रृती कुंभार, वैष्णवी काळे, प्राजक्ता कोळी, संस्कृती दांगट, पियुषा पाडवी सहभागी झाल्या होत्या. तसेच आगरकर हायस्कूलचे शिक्षक शंकर थोरात, शिंदे सर त्याचबरोबर अंगणवाडी सेविका, मदतनीस व गावातील महिला ही यावेळी उपस्थित होत्या.