ताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराज्यसातारासामाजिक

बनवडी ग्रामपंचायत विकास कामात नेहमी अग्रेसर : विकास करांडे

कराड | विशाल वामनराव पाटील
निवडणूक काळात बनवडी येथील नागरिकांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता होत असल्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे. यापुढेही विकास कामात बनवडी ग्रामपंचायत नेहमी अग्रेसर असेल, असे प्रतिपादन माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य विकास करांडे यांनी केले.

बनवडी (ता. कराड) येथे श्री सिद्धिविनायक मंदिर परिसरात प्रस्तावित विकास कामांच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. बनवडी ग्रामपंचायत ग्रामनिधीच्या माध्यमातून श्री सिद्धिविनायक मंदिर परिसरामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी वॉकिंग ट्रॅक, ऑक्सिजन पार्क आणि वाचनालय उभारण्यात येणार आहे. या विकासकामांच्या भूमिपूजन प्रसंगी श्री. करांडे बोलत होते. ते पुढे म्हणाले, सत्ता सर्वसामान्य लोकांनी आम्हांला दिली, आता आम्ही विकासकामे करून तो विश्वास सार्थ ठरवत आहोत. यापुढील काळातही गावातील जास्तीत- जास्त विकासकामे करण्याचा आमचा मानस आहे.

यावेळी सरपंच प्रदीप पाटील, ग्रामपंचायत सदस्य अख्तर आत्तार, सदस्या सौ. पल्लवी साळुंखे, सौ. विद्या शिवदास, सौ. स्वाती गोतपागर, सौ. अलका पाटील, माजी उपसरपंच सुरेंद्र विभुते, हारून पठाण, पार्ले बनवडी सोसायटी संचालक मारुती साठे, माजी उपप्राचार्य मिलिंद गायकवाड, शांतताई कोठावळे, भाजप तालुका उपाध्यक्षा नम्रता कुलकर्णी, शीलवंत काका, श्रीकांत जाधव, पिंटू शिंदे, विजय खापे, मिलिंद पोतनीस, रामभाऊ गिरी, संदीप गोंजारी, नंदू सुतार, चंद्रकांत पोरे, सदाशिव नागणे, प्रमोद सावंत, अधिकराव कोळेकर, भिकूनाना कोठावळे, दिलीप मदने, सौ. उमा कोळेकर, देवकांत काकू. खापे वहिनी, संदीप साळुंखे, प्रकल्प विस्तारक राजू तळे, सोमनाथ तळे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker