पाटण तालुक्यात गव्याच्या हल्यात महिलेचा मृत्यू

पाटण | पाटण तालुक्यातील रिसवड गावात गव्याचा हल्ल्यामध्ये महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. वनविभागाच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. हिराबाई गोपीनाथ पवार (वय- 42) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नांव आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, रिसवड (ता. पाटण) येथे तीन दिवसापूर्वी शेतात काम करत असलेल्या महिलेवर गव्याने हल्ला केला होता. हल्ल्यानंतर हिराबाई पवार या महिलेस कराड येथे रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना आज तिचा मृत्यू झाला.
आज सकाळी शेतकऱ्यावर गव्याचा जीवघेणा हल्ला
मणदुर (ता. शिराळा) येथे वारणा डावा कालव्याच्या बाजुस असणार्या काळांमा देवीच्या मंदीर परीसरात शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास सदर गव्याने अशोक विष्णु सोनार (वय- 62) या शेतकर्यावर गंभीर हल्ला करुन जखमी केल्याची घटना घडली असुन ही माहीती मणदुर गावात समजताच यावेळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. गव्याने हल्ला करुन जखमी सोनार यांना कालव्याच्या बाजुला असणार्या रस्त्यावर फेकुन दिले. शेजारीच शेतात काम करत असलेल्या शेतकर्यांनी आरडाओरडा केल्याने गवा डोंगराच्या दिशेने पळुन गेला. दरम्यान, वनविभागाचे वनपाल गार्दी यांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेत याची माहीती वरीष्ठांना दिली जखमीवर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डाॅक्टरांनी प्रथमो उपचार करुन पुढील उपचारासाठी कराड येथील कृष्णा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.