कामाचे फुकटचे श्रेय घेणाऱ्यांपासून सावध रहा : आमदार बाळासाहेब पाटील
कण्हेरखेड येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन
कराड | मतदार संघामध्ये विविध विकासकामे सुचवण्याचा व त्यासाठी प्राधान्यक्रम देण्याचा तसेच निधी उपलब्ध करून घेण्याचा अधिकार लोकप्रतिनिधी या नात्याने आपल्या सहकार्याने मला मिळाला आहे. त्या माध्यमातून मी कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील सर्व गावे, वाड्या, वस्त्यांना समान न्यायाने निधीचे वाटप केला. मतदार संघात विकासाचा झंजावात सुरू आहे. मात्र, निवडणुका जवळ आल्या की काही मंडळी झालेली विकास कामे आम्हीच केली. या अविर्भावामध्ये भाषणबाजी करतात व श्रेय घेण्याचा प्रयत्न करतात. अशा लोकांपासून सावध रहा, असे आवाहन आमदार बाळासाहेब यांनी केले. कण्हेरखेड (ता. कोरेगाव) येथे त्यांच्याच विशेष प्रयत्नाने व निधीतून मंजूर झालेल्या विविध विकास कामांच्या भूमिपूजन व उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
यावेळी आमदार स्थानिक विकास निधी सन 2022-23 मधून मंजूर झालेल्या बौद्ध वस्ती मधील सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन, आमदार स्थानिक विकास निधी सन 2021-22 मधून मंजूर होऊन पूर्ण झालेल्या श्री गणेश मंदिरासमोरील सभागृहाचे उद्घाटन, ‘क’ वर्ग पर्यटन निधी सन 2022- 23 मधून स्वर्गीय माधवराव शिंदे सभागृहाचे नूतनीकरण करणे या कामाचे भूमिपूजन, 2515 इतर जिल्हा ग्रामीण विकास निधीतून काळुबाई मंदिरासमोर सामाजिक सभागृह बांधणे, पुरवणी अर्थसंकल्प डिसेंबर 2020 मधून मंजूर झालेल्या कन्हेरखेड-एकंबे रस्त्याचे व त्या रस्त्यावरील पुलांचे उद्घाटन, 5054 इतर जिल्हा मार्ग विकास निधी सन 2021 मधून मंजूर झालेल्या जायगाव- कन्हेरखेड- वेलंग दुघी – कठापूर इजिमा 82 रस्ता सुधारणा करणे या कामाचे उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे संचालक अविनाश माने, काकासो गायकवाड, भरत कदम, अमोल कदम, शंकर शिंदे, प्रशांत संकपाळ, विजय कदम, समाधान कदम, प्रशांत कदम, अलम डफेदार, समाधान गायकवाड, शेखर पाटणे, विठ्ठल काकडे, शिवाजी महागडे, एकनाथ जेधे, शंकर सणस, धोम पाटबंधारे विभागाचे उपअभियंता कुलकर्णी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता राजेश धुमाळ, साखरे, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे शाखा अभियंता चव्हाण, सरपंच संजय शिंदे(सरकार), ॲड. दीपक शिंदे, चेअरमन संभाजी शिंदे, व्हा. चेअरमन वाघमारे सर, दुष्यंत शिंदे, केशव शिंदे, हणमंत साळुंखे, विश्वास शिंदे, समीर शिंदे, हणमंत पवा,र तानाजी बुधावले, धनाजी भोसले, अंकुश भोसले, रविंद्र पवार, दत्तात्रय पवार, प्रवीण साळुंखे, महेंद्र शिंदे, दीपक अंकुश शिंदे, संतोष साळुंखे, विश्वास शिंदे, संग्राम शिंदे, कुणाल शिंदे, प्रणव शिंदे, सुभाष शिंदे, अमर शिंदे, मंथन साळुंखे, सौ.अर्चना शिंदे, सौ.नलिनी पवार, सौ रुपाली साळुंखे, सौ.वर्षा शिंदे, सौ.कांचन शिंदे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.