वर्णे सोसायटीत सत्ताधारी भैरवनाथ पॅनेलचा विजय
देशमुखनगर प्रतिनिधी | सतिश जाधव
वर्णे (ता. सातारा) विकास सेवा सोसायटी पंचवार्षिक निवडणुकीत स्वर्गीय जयसिंग गुरुजींच्या भैरवनाथ पॅनलचे सर्व उमेदवार भरघोस मताधिक्याने विजय मिळवला. नागरिकांचा मागास प्रवर्ग मतदार संघातून एक उमेदवार बिनविरोध निवडून विजयाचा शुभारंभ भैरवनाथ पॅनेलने केला. या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांवर मतदारांनी विश्वास ठेवत विरोधकांचा धुव्वा उडविला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नितीन सूपेकर यांनी काम पाहिले.
शेतकरी सभासदांचे हित लक्षात घेता गट तट बाजूला ठेवून, सर्वपक्षीय व समविचारी कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन मूळ भैरवनाथ पॅनेलची 40 वर्षाची असलेली अपराजित परंपरा कायम ठेवत ज्येष्ठांचे मार्गदर्शन व तरुणांच्या परिश्रमावर वर्णे विकास सेवा सोसायटीचा अभेद्य गड राखण्यात भैरवनाथ पॅनेल यशस्वी झाले. निवडणुकीला सामोरे जात असता सभासदांसमोर ठेवलेला जाहीरनामा व संस्थेचा आज अखेर केलेला कारभार यावर जनतेने विश्वास ठेवून मतपेटीच्या माध्यमातून विरोधकांचा धुव्वा उडवला.
या निवडणुकीत विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे ः- सर्वसाधारण मतदारसंघातून ः- किशोर पवार, किरण पवार, युवराज पवार, नितीन जाधव, शिवाजी पवार, अभिजीत पवार, काशिनाथ सपकाळ, रणजीत पवार. महिला राखीव मतदार संघातूनः- अर्चना पवार, उषा पवार. नागरिकांचा मागास प्रवर्ग मतदार संघातून ः- सदाशिव कुंभार. अनुसूचित जाती मतदारसंघातून ः- भीमराव धसके. भटक्या विमुक्त मतदार संघातून ः- दत्तात्रय मदने.