सह्याद्री साखर कारखान्यात मोठा भ्रष्टाचार :- आ. मनोज घोरपडे
कृष्णा हॉस्पिटलमध्ये जखमींची विचारपूस

कराड: – सह्याद्री सहकारी साखर कारखान्यात सकाळी झालेल्या स्फोटातील जखमींची कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे यांनी कृष्णा हॉस्पिटल येथे जाऊन विचारपूस केली. सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या कामात मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांवर कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे यांनी केला.
यावेळी रणजित पाटील, केएम शुगर कारखाना संचालक महेश चव्हाण, अमोल पवार, कृष्णत शेडगे, राहूल पार्लेकर आदी उपस्थित होते.
आ. मनोज घोरपडे म्हणाले, सह्याद्री साखर कारखान्यात ईएसपी बॉयलर स्फोटात पाच कामगार जखमी झाले आहेत. क्षमता नसलेल्या कंपनीला काम दिले आहे. कारखान्याची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून टेस्टिंग चालू केल्याने दुर्घटना झाली आहे. कारखान्यात निकृष्ट दर्जाचे काम झाल्याने स्फोट झाला. सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या कामात मोठा भ्रष्टाचार केला आहे.
कृष्णा साखर कारखाना आणि सह्याद्री कारखान्याचे विस्तारीकरण एकाचवेळी सुरु झाले. एका वर्षात कृष्णा कारखान्याचे काम पूर्ण झाले. मात्र,साडेतीन वर्षानंतरही कारखान्याचे काम पूर्णत्वास नाही, हा सत्ताधाऱ्याचा नाकर्तेपणा असल्याचा आरोप आ. घोरपडे यांनी केला.