कोल्हापूरक्राइमताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराज्यसातारा

हायवेला मालकट्रकच्या धडकेत मालखेड येथे दुचाकीस्वार जागीच ठार

कराड । पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर मालखेड (ता. कराड) येथे गुरूवारी सकाळी मालट्रकच्या नवीन चेसने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील एक 55 वर्षीय व्यक्ती जागीच ठार झाला. या घटनेची नोंद कराड पोलिस ठाण्यात झाली असून मालट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. भगवान हरी मोरे (वय- 55, रा. बच्चे सावर्डे, ता. पन्हाळा) असे ठार झालेल्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माले येथील भगवान मोरे वारणा दूध संघात नोकरीस आहेत. त्यांचे सहकारी अशोक आनंदा जमदाडे (रा. मसूदमाले, ता. पन्हाळा) यांच्यासोबत ते कामानिमित्त गुरूवारी सकाळी दुचाकीवरुन (क्र. एमएच- 09 बीव्ही- 4915) कराडकडे येत होते. त्यावेळी मालखेड गावच्या हद्दीत पाठीमागून आलेल्या मालट्रकच्या नवीन चेसने दुचाकीला जोराची धडक दिली. धडकेनंतर ट्रक अंगावरून गेल्याने भगवान मोरे हे जागीच ठार झाले. तर अशोक जमदाडे बाजूला फेकले गेल्याने तेही गंभीर जखमी झाले.

अपघाताची माहिती मिळताच कराड तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक बाबर यांच्यासह कर्मचारी तातडीने त्याठिकाणी पोहोचले. तोपर्यंत ग्रामस्थांनी जखमी अशोक जमदाडे यांना रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने रस्त्यातून बाजूला घेवून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला. तसेच याप्रकरणी मालट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित बाबर तपास करीत आहेत.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker