भाजपा सदस्य नोंदणी अभियान : आ. अतुल बाबांचा कराड दक्षिण दुसऱ्या क्रमांकावर
प्रदेशाध्यक्ष मंञी चंद्रेशेखर बावनकुळेंनी केले आमदार अतुलबाबा भोसले यांचे विशेष अभिनंदन

कोल्हापूर :- भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रप्रदेश पस्चिम महाराष्ट्र विभागाची संघटनपर्व कार्यशाळा कोल्हापूर येथे पार पडली. यावेळी सदस्य नोंदणीमध्ये उल्लेखनीय कामगीरी करणार्या विधानसभा मतदार संघामध्ये अनुक्रमे इचलकरंजी विधानसभेचा पहिला तर कराड दक्षिण विधानसभेचा दुसरा, कवटेमहांकाळ विधानसभेचा तिसरा क्रमांक आल्याबद्दल पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून गौरव करण्यात आला.
या कार्यशाळेस भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंञी आमदार रविंद्र चव्हाण, मंञी चंद्रकांतदादा पाटील, संघटनमंञी मकरंद देशपांडे, किसानमोर्चा प्रदेशाध्यक्ष संदिप गिड्डे पाटील, प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, खासदार धनंजय महाडिक, माजी मंञी सुरेश खाडे, सदाभाऊ खोत मंञी शिवेंद्रसिंहराजे भोसले, मंञी जयकुमार गोरे, युवामोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या उपस्थितीत कार्यशाळा संपन्न झाली.
यावेळी आमदार अतुलबाबा भोसले, आमदार गोपिचंद पडळकर, आमदार मनोज घोरपडे, सुरेश हळवणकर, आमदार सत्यजित देशमुख,यांच्यासह पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हाध्यक्ष, मंडलअध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी यासह कराड दक्षिण विधानसभेचे मंडल अध्यक्ष धनंजय पाटील, उपाध्यक्ष तानाजी देशमुख, विस्तारक धनाजी माने, शहराध्यक्ष एकनाथ बागडी, ओ. बी. सी मोर्चा जिल्हाध्यक्ष भारत जंञे, रुपेश मुळे, युवामोर्चाचे संतोष हिंगसे, प्रमोद शिंदे, उमेश शिंदे, सुहास जगताप, शंकर पाटील उपस्थित होते.



