भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्रित म्हणजे कराड उत्तरमध्ये परिवर्तन : मनोजदादा घोरपडे
कोरेगाव । कराड उत्तर मतदार संघात आता कार्यकर्त्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता आगामी निवडणुकीसाठी कामाला लागावे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांचा एकत्रित कार्यक्रम म्हणजे परिवर्तन अटळ आहे, असे प्रतिपादन भाजपचे नेते मनोजदादा घोरपडे यांनी केले.
वेळू (ता. कोरेगाव) येथे विविध विकास कामाचा भूमिपूजन सोहळा पार पाडला. यावेळी मनोजदादा घोरपडे बोलत होते. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, भीमराव काका पाटील, संपतदादा माने, पंचायत समिती सदस्य अण्णासाहेब निकम, शिवसेना नेते वासुदेव माने, सरपंच धुर्योधन ननावरे, उपसरपंच वैभव भोसले, चेअरमन प्रदीप भोसले, व्हॉईस चेअरमन प्रदीप चव्हाण, यावेळी विकास राऊत, नेताजी भोसले, तात्यासो साबळे, आनंदराव चव्हाण, दादसो पवार, नागेश अडसूळ, मोहन निकम, महिपती यादव, महेश उबाळे, विघ्नेश पवार, सोमनाथ निकम , नामदेव मोरे,सुहास निकम सर,प्रकाश निकम, ज्ञानेश्वर कदम, काकासो कणसे, उधव गायकवाड,आदि ग्रामस्थ उपस्तिथ होते. यांची प्रमुख उपस्थिति होती.
मनोजदादा घोरपडे म्हणाले, आज वेळू या गावामध्ये विविध विकास कामांचे भूमिपूजन केले आहे. आजपर्यंत भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून विविध विकास कामे केली आहेत. या गावानेसुद्धा विधानसभेमध्ये भरभरून मतदान दिले आहे. आता तिन्ही पक्षाचे नेते व कार्यकर्ते एकत्रित आल्याने उच्चांकी मतदान होणार आहे, असे चित्र संपूर्ण मतदार संघात आहे. प्रत्येक गावामध्ये राजकीय गट– तट असून आपआपसातील मतभेद विसरून महायुतीच्या माध्यमातून परिवर्तनसाठी व गावाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्रित येऊन एक दिलाने कामं करावे. आगामी काळामध्ये गावातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी कायमच आपल्या सोबत मी असणार आहे. सूत्रसंचालन तात्या साबळे यांनी केले. आभार सतीश भोसले यांनी मानले.