भाजपाची शरद पवारांना केंद्रीय मंत्रीपदाची ऑफर : बड्या नेत्याचा गाैप्यस्फोट

हॅलो न्यूज। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार यांची भेटीमुळे राजकारण चांगलेच तापलेलं असताना आता काॅंग्रेसचे नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गाैप्यस्फोट केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपने ऑफर दिली असल्याचे म्हटले आहे. शरद पवारांना केंद्रीय मंत्रीपदाची ऑफर दिली गेल्याचे आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटल्याने महाविकास आघाडी आणि महायुतीत खळबळ उडाली आहे.
भाजपकडून शरद पवार यांना केंद्रीय कृषी मंत्रीपद आणि नीती आयोगाच्या अध्यक्षपदाची ऑफर देण्यात आली आहे. परंतु शरद पवार यांनी भाजपाची ऑफर नाकारली आहे. दोन दिवसापूर्वी काका- पुतण्याची भेट पुण्यातील उद्योगपती अतुल चोरडिया यांच्या निवासस्थानी झाली असल्याचे सांगितले जात होते. परंतु, या बैठकीत घडले, ही बैठक झाली की नाही. याबाबत तर्कविर्तक लढवले जात होते. त्यानंतर काल सोलापूरात खुद्द शरद पवार यांनी भेट झाल्याचे सांगितले. या भेटीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मात्र अनभिज्ञ होते. कारण दरे येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी भेटीची माहिती नसून झाली नसल्याचंही सांगितले जात आहे, असे म्हटले होते.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या गाैप्यस्फोटामुळे शिंदे गटात अस्वस्थता पहायला मिळू शकते. राष्ट्रवादीचा गट आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा महायुतीत समावेश झाला, त्यांना मंत्रिपद मिळाली. परंतु शिंदे गटातील अनेकांना अद्यापही मंत्रिपदे मिळाली नाहीत. अशावेळी शरद पवारांना भाजपाकडून केंद्रीय मंत्रीपदाची ऑफर म्हणजे महायुतीत सर्वकाही अलबेल आहे, असे नाही. यामध्ये शिंदे गटाची घुसमट होत असल्याचे वारंवार दिसत आहे.