ताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराजकियराज्यसातारा

आमदारांनी दुटप्पी भूमीका बदलावी अन्यथा जशास तसे उत्तर देवू : विक्रम पावसकर

भाजपा- शिवसेनेच्या माध्यमातून विरवडे फाटा ते ओगलेवाडी रस्त्याचे भूमीपूजन

कराड | कराड उत्तरच्या आमदारांनी त्यांची दुटप्पी भूमीका बदलावी. शासन विकास कामांसाठी निधी देत नाही, असे मिडीया समोर बोलायचे आणि मतदार संघात आले की आम्ही मंजुर करुन आणलेल्या विकास कामांचे नारळ फोडायचे. कराड उत्तर मतदार संघातील विकास कामे स्वत: मंजूर करुन आणले असे सांगायचे, अशी असलेली तुमची दुटप्पी भुमिका बदला अन्यथा जशास तसे उत्तर दिले जाईल असा इशारा भाजपा प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी कराड उत्तरच्या आमदारांना दिला.

ओगलेवाडी (ता. कराड) येथे भाजपा- शिवसेना यांच्या माध्यमातून मंजुर रा. मा.142 मधील विरवडे फाटा ते ओगलेवाडी या रस्त्याचे भूमीपूजन भाजपा प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कराड उत्तर भाजपा नेते मनोजदादा घोरपडे, भाजपा तालुका अध्यक्ष महेश जाधव, पवन निकम, नानासो पिसाळ, संभाजी पिसाळ, पवन पिसाळ, विनोद देवकुळे, सुभाष पिसाळ, रमेश औंध, प्रविण नांगरे, पवन पिसाळ, विजय नांगरे, ऋषिकेश पिसाळ, विजयकुमार सोनुलकर, रोहित पवार, विशाल मदने, महेश डांगे, सागर कांबळे, श्रेयस माळी, ओमकार पाटील, सुरज चव्हाण आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

याप्रसंगी मनोजदादा घोरपडे म्हणाले, आजपर्यंत भाजपा सेनेच्या माध्यमातून चांगल्या प्रकारची विकास कामे केली असून येणाऱ्या काळात कराड उत्तरमध्ये विकासाचा असणारा बॅकलॉग भरुन काढणार आहे. आज संपूर्ण कराड उत्तरमध्ये महायुती व आमचे सहकारी पक्ष यांचे सर्व पदाधिकारी आम्ही सर्वजण एकदिलाने काम करत असुन येणाऱ्या 2024 च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये कराड उत्तरमधून मोठे मताधिक्य मिळेल.

आ. बाळासाहेब पाटील यांना नांव न घेता लगावला टोला
सध्या केंद्रात व राज्यात भाजपा- शिवसेना सरकार असून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या माध्यमातुन विरवडे फाटा ते ओगलेवाडी या रस्त्यासाठी 2 कोटी रुपये निधी मंजुर झाला असून हा रस्ता अतिशय दर्जेदार होऊन लोकांना दळणवळण सोयीचे होणार आहे. संपुर्ण राज्यात तसेच कराड उत्तरमध्ये भाजपा शिवसेना पदाधिकारी यांचे मार्फत भरघोस विकास निधी आला आहे. कराड उत्तरचे आमदार हे स्वत: न केलेल्या कामाचे फुकटचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करत  असून त्यांचा डाव कराड उत्तरमधील जनतेने ओळखला आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनता त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. निवडणुका आल्या की आमच्या कामाचे नारळ फोडायचे व त्याच व्यासपीठावर सरकारची बदनामी करण्याचे उद्योग बंद करा. संपूर्ण कराड उत्तरमध्ये आपण बिनकामाचे आमदार म्हणून परिचीत आहात. येणाऱ्या काळात आपण माजी आमदार होणार आहात, असा टोलाही विक्रम पावसकर यांनी आ. बाळासाहेब पाटील यांना नांव न घेता लगावला.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker