क्राइमताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रपुणेब्रेकिंगमुंबईराज्यरायगड

BREAKING NEWS : महामार्गावर बस दरीत कोसळली, 7-8 जणांचा मृत्यू

हॅलो न्यूज | जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर एक खासगी बस दरीत कोसळल्याने भीषण अपघात झाला आहे. पुण्याहून- गोरेगावकडे निघालेल्या झांज पथकाच्या बसचा पहाटे 4 वाजता बोरघाटातील शिंगरोबा मंदिर जवळ अपघात झाला. या अपघातात 7 ते 8 जणांचा जागीच मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. तर 20 ते 25 जण जखमी झाले आहेत. यातील 16 लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात पोलीस, अग्निशमन दल आणि स्थानिक ग्रामस्थांना यश आलं आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दलाचे जवान, स्थानिक ग्रामस्थ, हायकर्स ग्रुप आणि आयआरबीची टीम पोहोचली. या सर्वांनी रेस्क्यू ऑपरेशन युद्ध पातळीवर हाती घेतलं. सर्व जखमींना खोपोली नगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आणखी प्रवासी बसमध्ये अडकलेले आहेत. या सर्वांना बाहेर काढण्यासाठी बचाव पथकांकडून युद्धपातळीवर कार्य सुरू आहे.

खासगी बसमधून बाजी प्रभु वादक गट (झांज पथक) गोरेगाव येथील असून पुण्याचा कार्यक्रम संपवून गोरेगाव येथे जात होते, अशी माहिती रायगडचे पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली. या अपघातामुळे घटनास्थळी मोठी गर्दी झाली असून बचावकार्यही वेगात सुरू आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker