तळबीड येथे बैल पोळा सणानिमित्त बैल मालकांचा सन्मान
कराड । विशाल वामनराव पाटील
बैल पोळा सणानिमित्ताने तळबीड (ता. कराड) येथे बैलांच लंपी चर्मरोग लसीकरण व जंतुनाशक शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. देशी गोवंशाची जपणूक करणाऱ्या बैलमालकांचा सन्मान सोहळ्याचे ग्रामपंचायत व पशुवैद्यकीय विभागाच्या वतीने आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यास तळबीड गावच्या प्रथम लोकनियुक्त महिला सरपंच सौ मृणालिनी उमेश मोहिते उपस्थित होत्या.
या कार्यक्रमास पशुवैद्यकीय प्रमुख डॉ. श्री. भोसले, उपसरपंच वैशाली पाडळे, ग्रामपंचायत सदस्य दादासो मोहिते, विशाल मोहिते, वंदना वाघमारे, युवा नेते उमेश मोहिते, अतुल चव्हाण, शंकर चव्हाण, विनोद मोहिते, अभय मोहिते, ज्ञानेश्वर पाडळे, सचिन शहा, कृष्णत शिंदे, रामचंद्र कदम यांच्यासह बहुसंख्येने ग्रामस्थ व बैल मालक उपस्थित होते.
डाॅ. भोसले म्हणाले, बेंदूर सणाच्या निमित्ताने तळबीड येथे पशुपालकांच्या पर्यंत एकच संदेश पोहचवायचा आहे. यांत्रिकरणाच्या काळात देशी गोवंशांची जपणूक करायची आहे. बैल पाळणाऱ्या मालकांचा याठिकाणी सन्मान करण्यात आला आहे. लम्पी चर्मरोग आजार, जंतनाशक, गोचीडनाशक असा संयुक्त कार्यक्रम राबविण्यात आला. पशुपालकांनी यापुढेही या जनावरांचे पालन करावे, असे आवाहन करतो.