जुगाईदेवीच्या यात्रेत मलकापूरची बैलगाडी अर्ध्या लाखाची मानकरी

मल्हारपेठ प्रतिनिधी। निवास सुतार
उरुल (ता. पाटण) येथील जुगाई देवीच्या यात्रेनिमित्त भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले होते. या शर्यतीत मलकापुरच्या मायरा युवराज पाटील यांच्या बैलगाडीने 51 हजार 111 पहिले मानकरी ठरले. या मैदानात 100 बैलगाड्यांनी सहभाग नोंदवला. विजेत्या सर्व बैलगाडा मालकांना मानाची ढाल आणि बक्षीस देण्यात आले.
बैलगाडा शर्यतीचे नियोजन लोकनियुक्त सरपंच नितीन निकम, उपसरपंच सुनिल निकम, युवा उद्योजक सर्जेराव साळुंखे, लोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्यांचे संचालक शशिकांत निकम, ग्रामपंचायत सदस्य सतिश निकम, निवास सुतार, संकेत देसाई, तानाजी साळुंखे, सुनिल देसाई, विलास मोकाशी, संदेश मोकाशी, राजेंद्र देसाई, अनिल मोकाशी, राहुल निकम, आनंदराव निकम, बाळासाहेब निकम, भानुदास मोकाशी, महेश निकम, संग्राम मोकाशी, अमर खामकर, लोकेश खामकर, सतिश खामकर, हर्षवर्धन निकम, राजु निकम, विकास निकम, सुरेश दाभाडे यांच्यासह यात्रा कमेटीतील सर्व सदस्य,पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या जुगाई देवीच्या यात्रेत बैलगाडा शर्यतीतील विजेते पुढीलप्रमाणे
गुरसाळे येथील रॅायल कारभार सै्ारभ जाधव यांची बैलगाडी 41 हजार 111 रूपयाचे द्वितीय क्रमांकाचे ठरले. तृतीय क्रमांक नडशी येथील अमित पाटील यांच्या बैलगाडीने 31 हजार 111 पटकावले. तर 21 हजार 111 चतुर्थ क्रमांकाचे मुंढेचे अदविका अमित जमाले ठरले तर 11 हजार 111 पाचव्या क्रमांकाचे हिंगनोळेचे बुलेट शंभु ग्रुपनी पटकावले. विजेत्या सर्व बैलगाडा मालकांना मानाची ढाल आणि बक्षीस देण्यात आले. या बैलगाडा शर्यतीसाठी यात्रा कमेटीच्या योग्य नियोजन करण्यात आले होते. यात्रा कमेटीच्या वतीने बक्षीस दात्यांचे व सहकार्य करणाऱ्या सर्वांचे शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.