बैलगाडी शर्यत : ‘कराड उत्तर केसरी 2023’ किताब पक्ष्या आणि रायफल बैलजोडीने पटकावला

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे युवा नेते तथा जिल्हा परिषद सदस्य व खटाव- माण साखर कारखान्याचे को- चेअरमन मनोजदादा घोरपडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित ‘कराड उत्तर केसरी- 2023’ बैलगाडा शर्यतीमध्ये वाई येथील पैलवान सचिन चव्हाण आणि संग्राम भैया बनकर (कोरेगाव) बाळू शेठ (पनवेल) यांच्या पक्ष्या आणि रायफल या बैल जोडीने पहिल्या क्रमांकाचे एक लाख 75 हजार रुपयांचे बक्षीस व मानाची ढाल पटकावली. कराड उत्तरचे नेते मनोज दादा घोरपडे यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.
किवळ (ता. कराड) आयोजित बैलगाडी शर्यतीसाठी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला गेला. बैलगाडी शाैकिनांनीही मोठी गर्दी केली होती. रात्री उशिरा या बैलगाडी शर्यतीची फायनल झाली. फायनलसाठी 8 बैलगाड्या पात्र झाल्या होत्या. विजेत्या सर्व बैलगाड्यांना मानाची ढाल व रोख रक्कम देवून गाैरविण्यात आले. या शर्यतीचे समालोचक म्हणून सुनील मोरे (पेडगाव) आणि विकास जगदाळे (कुमठे) यांनी काम पाहिले. झेंडा पंच म्हणून धनावडे बापू (कोरेगाव) यांनी काम पाहिले.
कराड उत्तर केसरी बैलगाडी शर्यत 2023 मधील विजेते पुढीलप्रमाणे ः-
प्रथम क्रमांक (1 लाख 75 हजार रूपये) ः- पै. सचिन चव्हाण (वाई) आणि संग्राम भैय्या बनकर (कोरेगाव), बाळूशेठ (पनवेल) यांचा पक्ष्या आणि रायफल बैलजोडी. दुसरा क्रमांक (1 लाख रूपये) ः- अक्षय शिवाजी मोरे (गोडोली- सातारा) आणि राजुशेठ जुगदर (कलेढोण) यांचा लक्ष्मणराव आणि बलमा बैलजोडी. तृतीय क्रमांक (75 हजार रूपये) ः- शारदा पाटील (पुणे) आणि मंगलमुर्ती प्रसन्न (वाटेगाव) यांचा राजा आणि माऊली बैलजोडी. चतुर्थ क्रमांक (55 हजार रूपये) ः- सरपंच सोमनाथ चव्हाण (कालगाव) आणि सदाशिव कदम मास्तर (रेठरे) यांचा भारत आणि महिब्या बैलजोडी. पाचवा क्रमांक (35 हजार रूपये) ः- समीर महादेव भोईर (मोठागाव) बाबर गोठा ग्रुप (कात्रज) आणि श्रीराम पालवे पीएसआय (सदाशिवनगर) यांचा नंद्या आणि सरदार बैलजोडी. सहावा क्रमांक (25 हजार रूपये) ः- महेश आप्पा चव्हाण, सोमनाथ चव्हाण (कालगांव) आणि श्रावणी दत्ता शिंदे (पाटखळ) यांचा शिवा आणि पतंग बैलजोडी. सातवा क्रमांक (15 हजार रूपये) ः- आप्पा कुर्लेकर (राजाचे कुर्ले) आणि कॅप्टन खाशाबा दाजी शिंदे (सैदापूर) वाशा आणि बब्या बैलजोडी. आठवा क्रमांक ः- अमित सतिश पाटील (नडशी- मालगाव) यांचा बलमा आणि बादलची बैलगाडी