ताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रब्रेकिंगराजकियराज्यसातारा
मंत्रिमंडळ विस्तार व खाते वाटप 3 ते 4 दिवसात : शंभूराज देसाई

कराड | मंत्रिमंडळ विस्ताराबाबत शंभूराज देसाई म्हणाले, सोमवारपासून मंत्रिमंडळाचे तीन आठवड्यांचे पावसाळी अधिवेशन सुरू होत असून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री लवकरच विस्तार व खाते वाटप करतील. मंत्रिमंडळ विस्तार व खाते वाटप पावसाळी अधिवेशनापूर्वी होईल, असे वाटते.
साताऱ्याचे पालकमंत्री पद राष्ट्रवादी आणि अजित पवारांना देण्याबाबत शंभूराज देसाई म्हणाले, जो निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेतील तो आम्हाला मान्य असेल.
कलंकित शब्द वापरल्याने ॲक्शनला रिॲक्शन येणारच
उद्धव ठाकरे संयमी नेते, मात्र संजय राऊत जवळ असल्याने सवयीचा परिणाम झाल्याने देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत बोलले असावेत. आता ॲक्शनला रिॲक्शन येत आहे .