उद्या सातारा बंदची हाक… मेसेजबाबत सत्यता वाचा
सातारा प्रतिनिधी | वैभव बोडके
मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत असून सरकार कोणताही निर्णय घेत नाही. या पार्श्वभूमीवर आता मराठा बांधव आक्रमक झाल्याला पहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी जाळपोळ झाल्याचा घटना घडत आहेत. तर राष्ट्रवादीच्या दोन आमदारांच्या घराची जाळपोळ करण्यात आली आहे. यामुळे आता उद्या महाराष्ट्र बंदची हाक असल्याचे मेसेज सोशल मिडियावर फिरत आहेत. यामध्ये सातारा जिल्हा बंदची हाक असल्याचेही मेसेज फिरत आहेत.
आज कराड येथे हजारोंच्या संख्येने मराठा बांधवांनी मोर्चा काढला. यानंतर तीन युवकांनी 50 फुटी होर्डिंग्जवर चढत मराठा आरक्षणांची मागणी करत पोलिसांची चांगलीच धावपळ उडवली. तसेच राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके आणि बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या घरे पेटवली. तसेच अनेक ठिकाणी टायर पेटवून आपला राग व्यक्त केला. यामध्ये सरकारचाच हात असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.
महाराष्ट्र बंदच्या हाक दिली असून त्यामध्ये मंगळवार दि. 31 रोजी सातारा जिल्हा बंद असणार असल्याची माहिती मराठा समन्वयकांनी दिली आहे. मनोज जरांगे- पाटील यांची प्रकृती खालवत असून सरकार अजूनही ठोस निर्णय घेत नसल्याने आता मराठा समाजही आक्रमक झाला आहे.