कंत्राटी भरतीवरून आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले… देवेंद्र फडणवीसांना धन्यवाद दिले पाहिजेत

कराड | विशाल वामनराव पाटील
देवेंद्र फडणवीसांनी 6 सप्टेंबर 2023 सालचा त्यांनी काढलेला कार्यकारी पदावर भरती करण्याचा जीआर त्यांचा मागे घेतला आहे. चूक झाली, त्यांनी कबूल केली. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांना धन्यवाद दिले पाहिजेत. त्यांनी केलेली चूक आणि दुरूस्ती केली असल्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे. कंत्राटी भरतीचा जीआर मागे घेण्याच्या राजकारणात आता आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी नवा गाैप्यस्फोट केला आहे.
कराड येथे निवासस्थानी आ. पृथ्वीराज चव्हाण माध्यमांशी बोलत होते. यावेळी आ. श्री. चव्हाण पुढे म्हणाले, चूक दुरूस्ती करताना देवेंद्र फडणवीस यांनी कंत्राटी भरतीचा जीआर हे आघाडी सरकारचे पाप म्हणाले. परंतु, त्या आघाडी सरकारमध्ये एकनाथ शिंदे, अजित पवार होते. कॅबिनेटमध्ये जो निर्णय घेतला, तो मुख्यमंत्री जाहीर करतात. परंतु पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांना बाहेर ठेवले. कारण त्या दोघांनी देवेंद्र फडणवीस यांना ते तुमचे पाप होते म्हणाले असतील. या शिंदे- फडणवीस आणि पवार सरकारमध्ये आता कंत्राटी भरतीच पाप कोणाच होत, ते त्यांनी ठरवावं. परंतु, अशावेळी सप्टेंबर 2023 मध्ये जीआर का काढला. तोच जीआर देवेंद्र फडणवीसांनी रद्द केलेला आहे.
गेल्या सव्वा महिन्यापूर्वी काढलेला कंत्राटी भरतीचा जीआर रद्द केला. युवकांच्या रेट्यामुळे आणि विरोधकांच्या आक्रमतेमुळे जीआर परत घेतल्याचेही आ. चव्हाण म्हणाले. भाजप आणि महाविकास आघाडी यांच्यात कंत्राटी भरतीवरून राज्यात राजकारण तापलेलं असताना. आता नवनवीन माहिती समोर येवू लागली आहे. यामध्ये 1998 साली भाजप- शिवसेना युती सरकारच्या काळात कंत्राटी भरतीचा जीआर काढण्याबाबत सुरूवात झाल्याचे आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
अग्नीवीर भरती म्हणजे कंत्राटी भरती
अग्नीवीर भरती म्हणजे कंत्राटी भरती असून त्यांचा निर्णय नरेंद्र मोदींनी पहिल्यांदा घेतला. तरूण युवकांचे शिक्षण थांबवून त्यांना तीन वर्षासाठी सैन्य भरती करायचे आणि पुन्हा रस्त्यावर सोडायचं. भारतीय सैन्य दलात सुरू असलेली ही कंत्राटी भरती महाराष्ट्र राज्य सरकारला मान्य आहे का, त्यांनी कॅबिनेटमध्ये तसा ठराव करून या निर्णयाचे स्वागत करावे. त्यानंतर तुम्हांला युवकांचा राग, रोष काय असतो हे कळेल, असाही इशारा आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला.



