(Video) माझी *** भागली, हाफचड्डी कधी गेली समजलंच नाही – छ. उदयनराजे भोसले

सातारा प्रतिनिधी | वैभव बोडके
भाजपचे राज्यसभा खासदार छ. उदयनराजे भोसले यांनी आगामी लोकसभा निवडणुकीविषयी सूचक वक्तव्य केलं असून भाजपकडून आगामी निवडणुकीत तिकिट मिळणार नसल्याचे संकेत दिले आहेत. तसेच आता छ. उदयनराजे भोसले यांच्या या विधानामुळे भाजपकडून नक्की कोण लोकसभेचा उमेदवार असणार याबाबत तर्कवितर्क लढवले जावू लागले आहेत. सातारा येथे माध्यमांशी बोलताना छ. उदयनराजे यांनी आगामी लोकसभा निवडणूक लढणार का या प्रश्नावरील विधानामुळे राजकारणात चर्चांना उधाण आले आहे.
सातारा जिल्ह्याचा पुढचा खासदार कोण?(हँलो न्यूज पोल- 2024)
खालील फेसबुक लिंकवर आपलं मत नोंदवा
https://www.facebook.com/groups/1728379947631362/permalink/1728397130962977/?mibextid=Nif5oz
खालील युट्यूब लिंकवर आपलं मत नोंदवा
https://youtube.com/@vishal_patil?si=4-CsPL6XqCuJ1wFN
छ. उदयनराजे भोसले म्हणाले, माजी निवडणूकीची *** भागली. तू उभा रहा, मी प्रचारक म्हणून राहतो. बघता बघता मी 50 चा कधी झालो, माहिती नाही. हाफचड्डी कधी गेली, शाळा सुटली, काॅलेज संपलं, लग्न होवून एवढं वर्षी झाली पण समजलेच नाही. रिटायरमेंटचे जे वय शासनात असते, तसे वय राजकारणात पाहिजे. प्रत्येकजण म्हणणार तरूणांना वाव दिला जावा आणि उत्तर काय असतं, लोकांचा आग्रह होता म्हणू मला नाय म्हणता आलं नाही. त्यांची मन दुखावली असतं, असा टोला नाव न घेता शरद पवार यांना लगावला. तेव्हा योग्य वयात तरूण राजकारणात आले पाहिजे.
शरद पवारांनी मार्गदर्शकाच्या भूमिकेत रहावं छ.उदयनराजे
शरद पवारांनी आता मार्गदर्शक म्हणून भूमिका असावी असे मला वाटते. त्यांनी मुख्यमंत्री केंद्रात सर्व भोगले, त्यांनी आता मार्गदर्शक भूमिकेत असले पाहिजेत.अनुभव हा मोठा गुरू असतो, त्यामुळे शरद पवारांचा अनुभव पाहता, त्यांनी मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहणं योग्य वाटतं. कॉग्रेस पक्षाने सत्ता असताना आणि आताही केवळ त्यांनी फक्त वोट बँक बघितली. आता जात निहाय जनगननेची मागणी होते. लोक कदर करणार नाहीत. ज्यावेळेस राजेशाही होती, त्याचं रुपांतर लोकशाहीत झाले. राजघराण्यासोबत लोक राहिली, सहकार्य केले, असंही छ. उदयनराजे म्हणाले.