
सातारा प्रतिनिधी | वैभव बोडके
वर्षा ड्रग्ज माफियाचा अड्डा झालाय, या विरोधकांच्या टिकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मुख्यमंत्री म्हणाले, विरोधकांना काही काम नाही, रोज आरोप करतायतं, आम्ही कामातुन उत्तर देतोय. त्यांनी बंद पाडलेले प्रकल्प आम्ही सुरू करतोय. इगो ठेवुन तुम्ही कामं बंद केललं, असे राज्यकर्ते नसतात. अहंकारी वृत्तीने राज्य चालत नाही. त्यामुळे आम्ही त्याच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही. त्यांना सकाळी उटल्यावर काही काम नसत, त्यामुळे ते बोलतात. आम्ही राज्यातील विकासाचे प्रकल्प पुढे नेतोय. यामुळं जे कोणी बोलतायेत त्यांना काही बोलायचं नाही
अजित पवार गटानं आंदोलन केलं यावर मुख्यमंत्री नाराज होते?
काल आमची बैठक झाली यात तिन्ही पक्षांच्या समन्वया बाबत बैठक झाली, यासाठी चर्चा झाली. मराठा आरक्षणाच्या बाबतीत बोलणं झालं. शिवसेना- भाजपा, अजित पवार राष्ट्रवादी हे एक दिलानं काम करतील आणि येणा-या लोकसभेत लोकं आम्ही केलेलं काम पाहुन राज्यात 45 जागांवर आल्या शिवाय राहणार नाहीत.
दिवसरात्र एक करून मराठा समाजाला टिकणार आरक्षण देवू
मनोज जरांगे पाटील यांना मी धन्यवाद दिलेत. सरकार मराठा समाजाच्यासाठी टिकणारं आणि कायद्याच्या चौकटीत बसणार आरक्षण देणार आहोत. शासनाच्या शब्दावर विश्वास ठेवले आहे. आम्ही दिवसरात्र एक करून कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देवू.